
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानीवरी जवळ इको गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जण जागीच ठार, तर 6 जण जखमी झाले आहेत.
कासा - डहाणू तालुक्यातील मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी गावाजवळील सूसरी नदीच्या पुलावर मुंबई (माहीम) हून गुजरात वापी या ठिकाणी शेख कुटुंब आज लग्नाला जात असताना गाडीचा टायर फुटल्याने दुपारी २ वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, इको गाडी चा पुर्ण चक्काचूर झाला असून गाडीतील २ जण जागीच ठार झाले. त्यात एका 1 वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे
.मुंबई ( माहीम )हून आज शेख कुटुंब नातेवाईकांच्या वापी येथे लग्नाला जात होते , मात्र काळाने घात घेत सुखाच्या वेळी शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गाडीत एकूण लहान मुलासह 10 जण होते त्यातील नाझनीन शेख (46वर्षे ), मुझेन शेख (1 वर्ष ) हे दोघ जागीच ठार झाले. तर शाईन नाईक (46 वर्षे ), आशिक अली (65 वर्षे ), टूबा शेख(6 वर्षे) आतीफा शेख (9 वर्षे), जनाफ शेख (७वर्षे), जोया शेख(6)वर्षे व ड्रायव्हर अयान नाईक (29वर्षे ) हे सर्व जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या वर कासा उपजिल्हा रुग्णालयाला उपचार चालू आहेत .
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यसाठी येथे क्लिक करा
नेमक्या याच वेळी या महामार्गा वरून प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश माळी व जिल्हा उपाध्यक्ष निलेश कासट हे जात होते त्यांनी तेथे थांबून मदतकार्य केले जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.
palghar marathi news Terrible accident on Mumbai Ahmedabad Expressway at dhanivari
-----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )