आगरवाडीत घरफोडी; 14 तोळे सोने व रोख रकमेची चोरी

 प्रमोद पाटील
मंगळवार, 27 मार्च 2018

पालघर - जिल्हयातील सफाळे जवळच्या आगरवाडी गावातील चंद्रशेखर भालचंद्र गावड (वय45) यांच्या घरात घुसून रविवारी (25) रात्री चोरांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेची चोरी केली. रविवारी आगरवाडी येथे राम नवमीची यात्रा होती. या गावातील यात्रेला घरा-घरातून सर्वच जण जातात. याचा फायदा घेत चोरांनी घरफोडी केली. 

मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात काम करत असलेले चंद्रशेखर गावड रात्री 10.30 वाजता आपली पत्नी आणि मुली सोबत घराला कुलूप लावुन गेले. मात्र गावड कुटुंब यात्रेत गेल्याचे बघता पाळत ठेवलेल्या चोरांनी ताबडतोब त्यांच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कटावणीने तोडून कपाटाच्या चाव्या शोधून कपाटातून सुमारे 14 तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे तीस हजार रोख रक्कम घेऊन पोबारा केला. 

गावड कुटुंब रात्री 11.15 वाजता घरी परतल्यावर सदर घटना लक्षात आली. या बाबतीत कोणालाही अटक झाली नसून ओळखीच्याच व्यक्तींकडून ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बाबतीत केळवे सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धबा जायभाये अधिक तपास करत आहेत. 

नागरिकांना आवाहन
सदया यात्रांचे दिवस सुरू झाले असून यात्रेला जाताना घराचे दरवाजे व्यवस्थित बंद करून योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केळवे पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धबा जायभाये यांनी केले आहे  

Web Title: palghar mumbai crime robbery