उन्हाळ्यात धुक्‍याचे साम्राज्य!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

पालघर - दिवसाचे तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसवर जात असताना बुधवारी (ता. 28) पहाटे विरार ते डहाणू रोड पट्ट्यात धुक्‍याचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी गाड्या 15 ते 30 मिनिटे विलंबाने धावत होत्या. काही दिवसांपासून दुपारचे तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसवर जात आहे. त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उन्हाचे चटके जाणवत आहेत. रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत गरम वारे वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत; परंतु आज पहाटेपासून डहाणू रोड ते वैतरणा परिसरात अनेक ठिकाणी हिवाळ्यात अनुभवायला मिळते तसे धुके पडले होते.
Web Title: palghar mumbai news summer fog