पालघर : नगर पंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची खलबतं

ऊमेदवारांची चाचपणी, निश्चिती विषयी चर्चा
Political meeting
Political meetingsakal media

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील मोखाडा (mokhada), विक्रमगड आणि तलासरी या तिनही नगरपंचायतींच्या निवडणुका (Nagar panchayat election) अचानक जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला (Political parties election preparation) लागले आहेत. राजकीय पक्षांनी ऊमेदवारांची चाचपणी, ऊमेदवार निश्चिती (candidates declaration) तसेच युती व आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Political meeting
सणासुदीत कर्जमागणी वाढली; RBI च्या अहवालातील माहिती

जिल्ह्यातील मोखाडा, विक्रमगड आणि तलासरी या तीन नगरपंचायतीच्या मुदतपूर्व निवडणुका  21 डिसेंबर ला होऊ घातल्या आहेत. अचानक निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पक्षांची, निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष, आमदार सुनिल भुसारांनी मोखाडा, विक्रमगड आणि तलासरी येथे तातडीने पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहेत.

त्यामध्ये तिनही नगरपंचायतीच्या सर्व जागा लढवणे, ऊमेदवार निश्चित करून त्यांचे कागदपत्रे तयार करणे, तसेच युती व आघाडी बाबत निर्णय होईल तेव्हा होईल पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीची तयारी करावी याबाबत चर्चा झाली आहे. बैठकीत गटबाजीला थारा दिला जाणार नसून गद्दारांना माफी दिली जाणार नसल्याचा गर्भित इशारा आमदार सुनिल भुसारांनी बैठकीत दिला आहे. तसेच आघाडी बाबत ऊधा बैठक असल्याचे भुसारांनी सकाळला सांगितले आहे. 

शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांनी मोखाडा, विक्रमगड आणि तलासरी च्या तालुका प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ठाण्यात घेतली आहे. या बैठकीस पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा उपस्थित होते. या बैठकीत सर्व तालुका प्रमुखांकडुन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला गेला. आघाडी होईल ते नंतर बघू, मात्र, तिन ही नगरपंचायतीच्या सर्व जागा लावण्यासाठी ऊमेदवार निश्चित करा असे आदेश बैठकीत, दिल्याची माहिती शिवसेना मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील यांनी दिली आहे. 

भाजपनेही ऊमेदवार चाचपणी,  निश्चितीसह त्यांचे सर्व कागदपत्रांची तिनही ठिकाणी बैठका घेणे सुरू केले आहे. अनेक ठिकाणी ऊमेदवार निश्चित झाले मात्र, जातपडताळणीच्या अटीने मोठे बदल करावे लागत असल्याचे भाजप मोखाडा तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com