डहाणू: बोर्डी परिसरात पावसामुळे शेती, फळबागांचे नुकसान

अच्युत पाटील
सोमवार, 19 मार्च 2018

असंतुलित वातावरणामुळे चिकू आंबा, काळी, लाल, सफेद आणि हिरव्या जांबू फळांचे मोठे नुकसान झाले आहे. तर मानवी आरोग्यावर देखील परिणाम झाला असून सर्दी, खोकला सारखे आजार बळावू लागले आहेत. सोमवारी सकाळी देखील आभाळात ढग साठलेले आहेत. सकाळी आठ वाजेपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही तर वातावरण दुषितच होते.

बोर्डी : बोर्डी परिसरात आज (सोमवार) पहाटे तीन वाजताच्या सुमारास हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेती व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मानवी आरोग्यावरही परिणाम झाला आहे.

मागील पाचसहा दिवसापासून वातावरण प्रदूषित असुन आभाळ ढगाळ आहे. रविवारी दिवसभर वातावरण असंतुलित होते. दुपारच्या वेळेत वेगवान वारे सुटले होते. उष्णतेचे प्रमाण वाढले होते. रात्री आठ वाजल्यानंतर हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र मध्यरात्री अचानक उष्णता वाढली आभाळ भरून आले. पश्चिम भागात वीजा चकमत होत्या. दरम्यान रात्री दोन वाजता वीज पुरवठा बंद पडला. वातावरणात उष्णता वाढत असतानाच पहाटे तीन वाजता हलक्या स्वरूपात पाऊस झाला आणि गारवा आला.

असंतुलित वातावरणामुळे चिकू आंबा, काळी, लाल, सफेद आणि हिरव्या जांबू फळांचे मोठे नुकसान झाले आहे. तर मानवी आरोग्यावर देखील परिणाम झाला असून सर्दी, खोकला सारखे आजार बळावू लागले आहेत. सोमवारी सकाळी देखील आभाळात ढग साठलेले आहेत. सकाळी आठ वाजेपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही तर वातावरण दुषितच होते.

Web Title: Palghar news rain affect farm