पालघर: बोर्डीत झाड कोसळून पाच जण जखमी

अच्युत पाटील
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

जखमींना गुजरातमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे उपलब्ध झालेली नाहीत. बोर्डी ग्रामपंचायत मुख्य मार्गावर विजय स्तंभच्या जवळच ही घटना घडली आहे.

बोर्डी : नारळाचे झाड पडून आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेले तीन महिला व दोन पुरुष मिळून पाच जण जखमी झाले असुन त्यात एक पर्यटकाचा समावेश आहे.

जखमींना गुजरातमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे उपलब्ध झालेली नाहीत. बोर्डी ग्रामपंचायत मुख्य मार्गावर विजय स्तंभच्या जवळच ही घटना घडली आहे.

आज शनिवारचा बाजार व गणेशोत्सव असल्याने खरेदीदारांची प्रचंड गर्दी झाली होती. कटलरी विक्रेत्याच्या दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या अंगावर अचानक नारळाचे झाड कोसळल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पंकज गडग व एस. एल. टोकरे घटनास्थळी पोचले. परंतु तत्पूर्वी जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले होते.

Web Title: Palghar news tree collapsed in Bordi