पालघर : सफाळ्यात धबधब्यावर पर्यटकांची गर्दी 

प्रमोद पाटील
रविवार, 13 ऑगस्ट 2017

कसे जाल?
लालठाणे येथील धबधबयावर जाण्यासाठी सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला एसटी बस बरोबरच खासगी वाहने रिक्षा, जिप उपलब्ध आहेत. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरईपासून 22 किलोमीटर अंतरावर तर पालघरपासून 17 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.

पालघर : रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला आणि ऐतिहासिक वनदूर्ग तांदूळवाडी किल्याच्या पायथ्याशी वसलेला लालठाणे येथील धबधब्यावर वर्षा सहलीची वर्दळ वाढली असून शनिवारी व रविवारी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात.

सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर लालठाणे हे गाव वसलेले आहे. या गावाच्या पूर्वेला अथांग पसरलेली आणि दूथडी भरून वाहणारी वैतरणा नदी तर पश्चिमेला ऐतिहासिक वनदूर्ग तांदूळवाडी किल्ला. त्याचबरोबर हिरवीगार वनराई आणि पशू पक्षांची किलबिल यामुळे लालठाणे येथील धबधब्यावर गेल्या काही वर्षापासून मुंबई आणि मुंबई उपनगरातील पर्यटक शनिवारी व रविवारी विकेंड वर्षा सहलीला मोठ्या प्रमाणात येत आहेत.

लालठाणे येथे दोन धबधबे असून त्यांना छोटा धबधबा आणि मोठा धबधबा असे संबोधले जाते. या धबधब्या बरोबरच टोकावर असलेल्या तांदूळवाडी किल्ल्यापर्यंत वन विभागाने व ग्रामस्थ यांच्या मदतीने दगडाच्या पायरया बनविण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून या धबधब्यावर पर्यटक गर्दी करत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे निवासाची उत्तम व्यवस्था असल्याने तसेच खवयांसाठी गावठी कोंबडे, गावठी मटण, नदीचे ताजे मासे, रान भाज्या विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.

कसे जाल?
लालठाणे येथील धबधबयावर जाण्यासाठी सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला एसटी बस बरोबरच खासगी वाहने रिक्षा, जिप उपलब्ध आहेत. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरईपासून 22 किलोमीटर अंतरावर तर पालघरपासून 17 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.

शनिवार व रविवार गर्दी
लालठाणे धबधब्यावर गेल्या दोन दिवसांपासून गर्दी उसळली आहे. शनिवार व रविवारी आलेल्या पर्यटकांनी रिपरिप चालू असलेल्या पावसामुळे धबधब्यावर खुप गर्दी केली होती. लालठाणे येथील गावात अनेक  पर्यटक मुक्कामी असतात. सतत सुरू असलेल्या पावसामुळे येथील निसर्गाच्या सौंदर्यात भर पडत आहे. येथील दोन्ही धबधबे पर्यटकांनी फुलले आहेत.

Web Title: Palghar news waterfall in saphale