esakal | पोटनिवडणुकीसाठी पालघर सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पोटनिवडणुकीसाठी पालघर सज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : जिल्हा परिषदेच्या १५ आणि पंचायत समितीच्या १४ अशा एकूण २९ जागांसाठी ५ ऑक्टोबर (october) रोजी मतदान (Voting) होणार आहे. या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यात विविध ठिकाणी ६२६ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी ३ हजार ४५५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. पालघर जिल्हा परिषदेचे १५ ग व पंचायत समितीचे १४ गण मिळून ३ लाख ६७ हजार ६०२ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ८० हजार ९१५ स्त्रिया तर १ लाख ८६ हजार ६९३ पुरुष मतदार आहेत. प्रत्येक केंद्रामध्ये केंद्रप्रमुख यांच्यासह अधिकारी वर्ग, शिपाई असणार आहेत. त्याचबरोबरीने कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असून प्रत्येक केंद्रावर मतदाराचे निर्जंतुकीकर त्याचबरोबरीने तोंडाला मुखपट्टी लाव बंधनकारक असणार आहे.

हेही वाचा: पंचायत राज कमेटीने पारोळा तालुक्याचा घेतला आढावा..

सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढत असल्याने सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सावरे एम्बुर आणि नंडोरे देवखोप हे दोन गट असून सावरे एम्बुर गटामध्ये पाच, तर नंडोरे-देवखोप गटामध्ये सहा उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील नऊ पंचायत समिती गणांसाठी ४७ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

loading image
go to top