पालघर साधू हत्या प्रकरणी गृहमंत्र्यांच्या गडचिंचले दौरा; तब्बल २० दिवसांनी समोर आली मोठी माहिती

पालघर साधू हत्या प्रकरणी गृहमंत्र्यांच्या गडचिंचले दौरा; तब्बल २० दिवसांनी समोर आली मोठी माहिती

पालघर :: पालघरमधील गडचिंचले  येथे साधूंची निर्घृण हत्या करण्यात आलेल्या घटनेला गुरुवारी 7 तारखेला 21 दिवस पूर्ण झाले. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या अमानवी हत्या प्रकरणाचा पाहणी दौरा महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी केला. इतक्या मोठ्या घटनेची पाहणी तब्बल 21 दिवसानंतर गृहमंत्र्यांकडून करण्यात आली तसेच यावेळी प्रसार माध्यमांना देखील दूर ठेवण्यात आले.

चोर समजून जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन साधू व एका वाहनचालकाचा मृत्यू झाल्याची घटना 16 मार्च रोजी घडली. आतपर्यंत पोलिसांनी 115 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकारी व 3 हवालदारांना निलंबित केले आहे. तसेच 35 पोलिसांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सी.आय.डी. करत आहे.

दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता कासा पोलीस ठाण्यात भेट दिली. जवळपास एक तास त्यांनी पोलिस ठाण्यात बसून चर्चा केली.  त्यानंतर मोठया पोलिस ताफ्यासह ते गडचिंचले येथे निघाले त्यांच्या सोबत पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पालघर एस.पी.  गौरव सिंग, प्रांत अधिकारी डॉ. सौरभ कटीयार,  पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार निवास वणगा,  तहसीलदार राहुल सारंग,  सी. आई.डी. अधिकारी, पोलिस, महसूल अधिकारी, वैदयकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

दरम्यान हा गुप्त दौरा असल्याचे कारण सांगून प्रसार माध्यामांना याठिकाणी येऊ दिले नाही. तसेच पोलिसांना देखील प्रसार माध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही. दरम्यान अशाप्रकारच्या गुप्त दौऱ्यामागे काय कारण असावे असा प्रश्न निर्माण होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचार बंदी लागू करण्यात आली अशात 16 मार्च रोजी दोन साधू व त्यांचा वाहन चालक असे तिघे कांदिवलीहून सुरत कडे जाण्यासाठी साठी निघाले.  त्यांची नावे सुशील महाराज (वय 35), चिकणे महाराज (वय 70) व वाहनचालक सुरेश तेलवडे (वय30) अशी होती. सुशील महाराज यांचे गुरुबंधू रामगिरी महाराज यांचे सुरत येथे निधन झाल्याने ते अंत्य विधी साठी निघाले. कांदिवली येथून सुशील महाराज वाहन चालकास घेऊन नाशिक येथे राहणाऱ्या चिकणे महाराज यांना घेऊन संचारबंदी असल्याने आड मार्गाने सुरत येथे जात असताना डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे त्यांना अडवून मोठ्या जमावाने चोर समजून दगड, काठ्यांच्या साह्याने मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला.

पालघर येथे पत्रकार परिषद
गडचिंचले परिसराचा दौरा केल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी पालघर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी या गडचिंचले प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे. या घटनेपूर्वी अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या अशी माहिती समोर आली, असून पोलिस प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन पाऊलं उचालली असती तर ही घटना घडली असती का? या बाबत देखील तपास सुरू असल्याचे त्यांनी  पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उतर देताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com