पाली-भूतिवली धरण ओव्हरफ्लो

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मुंबई : कर्जत तालुक्‍यातील पाली-भूतिवली लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरला आहे. धरणाचे कालवे पूर्ण नसल्याने धरणाचे पाणी शेतीसाठी सोडले जात नाही. त्यामुळे हे धरण जुलै महिन्यात भरून वाहू लागले. वर्षा सहलीसाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत तालुक्‍यातील या धरणावर पर्यटकांना येण्यास बंदी आहे. त्‍यामुळे प्रशासनाच्‍या निर्णयाविराेधात पर्यटकांमध्‍ये नाराजी आहे.   

पाली-भूतिवली लघु पाटबंधारे धरणाचा मुख्य बांध 2003 मध्ये घातला; मात्र आजपर्यंत धरणाचे पाणी परिसरात असलेल्या 1100 हेक्‍टर शेतीला सोडण्यासाठी बांधण्यात येणारे कालवे पाटबंधारे विभागाकडून खोदण्यात आले नाहीत. परिणामी 35 दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक राहते. त्यामुळे या वर्षी पावसाने जरी उशिरा सुरुवात केली असली, तरी अवघ्या दहा दिवसांत धरणाच्या जलाशयाने पातळी गाठली. सांडव्याखाली असलेल्या पायऱ्यांवर भिजण्याचा आनंद घेण्यास पर्यटकांना सध्या बंदी आहे. 

पाली-भूतिवली धरणात यापूर्वी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्‍यामुळे जिल्हा प्रशासनाने धबधब्यावर जाण्यास बंदी घातली होती. पर्यटकांच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेऊन पाली-भूतिवली धरणाच्या परिसरात जाण्यास बंदी घातली आहे. 
- अनिल घेरडीकर, पोलिस उप अधीक्षक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pali- bhutivali Dam overflow