पाम बीचवर  मद्यपींमुळे कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

नवी मुंबई - बेलापूरपासून सुरू होणाऱ्या पाम बीच मार्गावर सेक्‍टर १५ येथील वाईन शॉप व हॉटेल बाहेर उभ्या केल्या जाणाऱ्या मद्यपींच्या वाहनांमुळे येथे रोजच सायंकाळी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना मद्यपींच्या बेशिस्त पार्किंगमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत तक्रारी करूनही वाहतूक पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याने आता हा परिसरच नो पार्किंग करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

पाम बीच रोडवरील बेलापूर सेक्‍टर १५ येथील भूमिपुत्र मैदानापासून किल्ले गावठाण येथील क्रोमा शोरूमपर्यंतचा रस्त्यालगतची दारूची दुकाने व हॉटेलांशेजारी मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. या रस्त्याच्या एका बाजूला वाईन शॉप, हॉटेल व बार रेस्टॉरंट, स्पोर्टस्‌ शूजची दुकाने, मॅकडॉनल्ड; तर दुसऱ्या बाजूला रिलायन्स शोरूम व कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये आहेत. वाईन शॉप रस्त्याला लागूनच असल्याने रोज सायंकाळी वाहने रस्त्यावर उभी करून मद्यपी तेथे दारू खरेदीसाठी जातात. काही जण तर रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून दारू पीत असतात. येथील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांचेही प्रमाणही जास्त असल्याने हॉटेल बाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. सायंकाळी कार्यालये सुटत असल्यामुळे खासगी आणि कंपन्यांच्या वाहनांची वर्दळ येथे सुरू होते. या सर्व प्रकारांमुळे येथे दररोज सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना तासन्‌ तास रखडावे लागते. यात एखादी रुग्णवाहिका अडकली तर त्यातून मार्ग काढणेही अवघड होईल एवढी बिकट परिस्थिती येथे झाली आहे. त्यामुळे हा परिसर नो पार्किंग झोन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Palm Beach due to congestion on drinker