पाम बीच रस्त्यालगत आगीच्या वाढत्या घटना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नेरूळ - पाम बीच मार्गालगत काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना घडल्या असून, अनेक झाडे होरपळली आहेत. या आगीमुळे पाम बीचच्या सौंदर्याला बाधा येत असल्यामुळे उपाययोजनेची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

पाम बीच मार्गाच्या दोन्ही बाजूला टोलेजंग इमारती आहेत; तर काही भागात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्राची जागा आहे. पाम बीच मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. गेल्या काही वर्षात पालिकेने विविध वनस्पतींची लागवड केली. त्यामुळे हिरवाई तयार झाली आहे. 

करावे गावाच्या विरुद्ध दिशेला "चाणक्‍य' या मरीन केंद्राजवळ आठवडाभरात तीन वेळा आगीच्या घटना घडल्या. परंतु पाम बीच मार्गालगत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या सुक्‍या गवताला लागली. वाळलेले गवत व खाडीकिनारी येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग अधिक वेगाने भडकत असून, झाडे होरपळून झाडांचे नुकसान होत आहे. पारसिक हिललगतही गवताने पेट घेतल्याची घडली होती. या पार्श्‍वभूमीवर रस्त्यालगतचे वाळलेले गवत काढून टाकण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर जाणीवपूर्वक आग लावणाऱ्यांचा पालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

पाम बीच किनारी चाणक्‍य केंद्राजवळ व परिसरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे झाडे होरपळून वनसंपत्तीचे नुकसान होत आहे. या आगीवर अग्निशमन विभागाकडून नियंत्रण आणण्यात येते.

- ए. डी. बोराडे, अग्निशमन अधिकारी, नेरूळ 

Web Title: palm beach growing incidence of fire

टॅग्स