पेणमध्ये स्कूल बसचालकांचा बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

पेणमध्ये मागील आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तालुक्‍यासह शहरात सर्वत्र पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. पेण शहरातील लोकमान्य सोसायटी, देवनगरी सोसायटी, महाडिकवाडी आदी परिसराला जोडणारा रस्ता व मोरी येथून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यामुळे पेण न्यायालय येथे खचली आहे. यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चिंचपाडा गावाकडून वळसा मारून जावे लागत आहे.

मुंबई : तालुक्‍यासह शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेण न्यायालयाजवळील मोरी ओढ्याच्या पाण्यामुळे खचली. परिणामी लोकमान्य सोसायटी, देवनगरी, महाडिकवाडी, कारमेल स्कूल, ट्री हाऊसकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे स्कूल बस संघटनेने आज लाक्षणिक बंद पुकारला. याबाबत बस संघटनेने पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

पेणमध्ये मागील आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तालुक्‍यासह शहरात सर्वत्र पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. पेण शहरातील लोकमान्य सोसायटी, देवनगरी सोसायटी, महाडिकवाडी आदी परिसराला जोडणारा रस्ता व मोरी येथून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यामुळे पेण न्यायालय येथे खचली आहे. यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चिंचपाडा गावाकडून वळसा मारून जावे लागत आहे.

या परिसरात कारमेल स्कूल आहे. दररोज हजारो विद्यार्थी येथून ये-जा करत असतात. या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याने आज स्कूल बस संघटनेने लाक्षणिक बंद केला. यामुळे पालकांचे मात्र मोठे हाल झाले. स्कूल बस संघटनेचे पदाधिकारी हरीश बेकावडे, बापू बिराजदार, आनंद सत्वे यांच्यासह स्कूल बसचालकांनी आज मुख्याधिकारी अर्चना दिवे यांची भेट घेऊन ही मोरी तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pan issue