पाणजे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील

पाणजे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील
पाणजे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील

नवी मुंबई : महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) नवी मुंबई-उरणमधील पाणजे व करंजा जेट्टीजवळील परिसर सीआरझेड १ (पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील) अंतर्गत येत असल्याने त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे, असे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात नुकतेच सादर करण्यात आले. त्यामुळे पर्यावरणप्रेमींना दिलासा मिळाला आहे. 

सीआरझेड १ अंतर्गत खारफुटी क्षेत्र, प्रवाळ, पाणथळ, खारजमिनी, कासवांची घरटी-अधिवास, राष्ट्रीय उद्यान, संरक्षित जंगलांचा समावेश होतो. सीआरझेड २०११ च्या नियमांनुसार भरतीपासून जमिनीच्या दिशेने ५०० मीटरच्या अंतराच्या आत विकासकामांना अटकाव करण्यात आला आहे. सिडको ‘सीआरझेड २०११’च्या नियमांचे उल्लंघन करत असल्याप्रकरणी श्री एकवीरा आई प्रतिष्ठान व हनुमान कोळीवाडा मच्छीमार समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात एमसीझेडएमएने म्हटले आहे की, सीआरझेड २०११ च्या सूचनेनुसार नवा सागरी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (सीझेडएम) तयार करण्यात आला होता. २०१९ मध्ये या आराखड्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली होती. त्यानुसार पाणजे आणि करंजा जेट्टीजवळील परिसरात खारफुटी असल्याने ते सीआरझेड १ अंतर्गत येतात. त्यामुळे या भागात होत असलेल्या किंवा प्रस्तावित असलेल्या कामकाजाबाबत एमसीझेडएमएमार्फत चौकशी-पाहणी करण्यात येईल. 

एमसीझेडएमएने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे पाणजे व करंजा जेट्टीजवळील परिसर सीआरझेड- १ अंतर्गत येतो, हे अधोरेखित झाले आहे. ही आमच्यासाठी दिलासादायक गोष्ट आहे. 
- नंदकुमार पवार, अध्यक्ष, श्री एकवीरा प्रतिष्ठान.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com