भाजपाने शब्द पाळला; पंचम कलानी महापौर

पंचम कलानी महापौर
पंचम कलानी महापौर

उल्हासनगर: महानगरपालिकेत भाजपा-साई पक्षाची युती. भाजपाच्या 32 पैकी सर्वाधिक नगरसेवक हे टीम ओमी कलानी समर्थक. करारानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी मीना आयलानी तर दुसरी सव्वा वर्षाची खेप पंचम कलानी यांची. आयलानी यांचा कालावधी 4 जुलै मध्ये संपला. पण त्या राजीनामा देत नसल्याने बेबनावाची परिस्थिती. कलानी यांना साईपक्षातील 12 पैकी 7 नगरसेवकांचा विरोध. त्यांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. आणि साईच्या दुसऱ्या बंडखोर गटातील ज्योती बठीजा यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला.

शिवसेना-साई-राष्ट्रवादी-रिपाइं आठवले-काँग्रेस-भारिप-पीआरपी मिळून 41 हे होणारे विजयी संख्याबळ. पंचम कलानी यांना आव्हान देण्यात आले. अशात कमांडरची भूमिका निभावणारे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मुले उल्हासनगरातील मास्टरमाईंडांची टीम एकवटवली. धक्कातंत्र सुरू झाले आणि पप्पू कलानी-ज्योती कलानी यांची सून व ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शब्द पाळल्याने अशक्याचे शक्यात रूपांतर झाले.

पप्पू कलानी यांना इंदर भटीजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्याने कलानी जेल मध्ये आहेत. त्यांच्या जागी त्यांचे पुत्र ओमी कलानी यांनी राजकारणाची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी त्यांची आई ज्योती कलानी यांना त्यांच्या टीमच्या मदतीने आमदार म्हणून निवडून आणले. पोटनिवडणुकीतही बाजी मारली. आणि 2017 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत टीम ओमी कलानीचे नगरसेवक भाजपाच्या तिकिटावर निवडून आणले. भाजपाच्या 32 नगरसेवकांपैकी अधिकांश नगरसेवक ओमी कलानी टीमचे आहेत. वरिष्ठ पातळीवर पहिले सव्वा वर्ष मीना आयलानी व दुसरी खेप पंचम कलानी यांचा असा करार झाला. मात्र 4 जुलै ला आयलानी यांचा कालावधी संपल्यावरही त्या राजीनामा देत नसल्याने ओमी कलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे साकडे घातले. शेवटी आयलानी यांनी राजीनामा दिला खरा,पण कलानीला विरोध असलेल्या साई पक्षातील 12 पैकी 7 नगरसेवकांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. याखेळी मागे साईपक्ष अध्यक्ष गटनेते तथा उपमहापौर जीवन इदनानी यांचे डोके असण्याची शक्यता दब्या स्वरात वर्तवली जाऊ गेली. भाजपातील बोटावर मोजण्या इतपत असलेले नगरसेवक देखील कलानी यांच्या विरोधात असल्याची वातावरण निर्मिती तयार झाली. अशात रवींद्र चव्हाण यांनी कमांडरची सूत्रे हाती घेतली. पंचम कलानी यांचा महापौर पदाचा अर्ज सादर करताना उपमहापौर जीवन इदनानी,भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी,माजी महापौर मीना आयलानी, सभागृहनेते जमनादास पुरस्वानी, अभ्यासू नगरसेवक राजेश वधारिया सोबत असल्याने चव्हाण यांच्या कमांडरशीप काम दाखवणार असे वातावरण तयार झाले.

शिवसेना-साईपक्षाच्या दुसऱ्या गटाचे नगरसेवक पालघर मध्ये तर भाजपा-साईपक्षाच्या पहिल्या गटातील नगरसेवक गोव्यामध्ये गेले. जीवन इदनानी हे शहरातच राहिल्याने दाल मे कुछ तो काला है, जीवन यांनीच दुसऱ्या गटाला शिवसेनेत जाण्यासाठी उकसवले अशी चर्चा होऊ लागली.

मात्र जीवन इदनानी यांची पत्नी माजी महापौर आशा इदनानी, माजी महापौर मीना आयलानी यांच्या मध्ये उल्हासनगर महापौरांचे उमेदवार पंचम कलानी या तिघींचे प्रसन्न मुद्रेतील फोटो गोव्या मधून मासमीडियावर व्हायरल झाले. जे साई पक्षातील 7 नगरसेवक शिवसेने सोबत पालघर मध्ये होते त्यापैकी शेरी लुंड,नगरसेविका कंचन लुंड चे पती अमर लुंड यांचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण,ओमी कलानी,कुमार आयलानी,प्रकाश माखिजा,जमनादास पुरस्वानी यांच्या सोबतचे गोव्यातील फोटो ही व्हायरल झाल्याने कलाटणी मिळत गेली. जीवन इदनानी, ओमी कलानी, प्रकाश माखिजा, उद्योगपती सुमित चक्रवर्ती कोणत्याही परिस्थितीत पंचम कलानी ह्याच महापौर होणार असा दावा करणारे करणारे अभ्यासू नगरसेवक राजेश वधारिया आदी सर्व मास्टरमाईंड एकवटल्याचा संदेश उल्हासनगरात पसरला. तर दुसरीकडे शिवसेने सोबत असलेले राष्ट्रवादीला तटस्थ राहण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून मिळाले. विजयाची आकडेवारी घसरू लागल्याने साईपक्षाच्या ज्योती बठीजा यांनी माघार घेतल्याने पंचम कलानी यांच्या गळ्यात महापौर पदाची बिनविरोध माळ पडली. 2005 ते 2007 पर्यंत ज्योती कलानी ह्या महापौर होत्या. 11 वर्षाच्या तपा नंतर पुन्हा कलानी परिवाराला महापौरपद मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळला. चव्हाण यांनी ठाण मांडले. उपमहापौर जीवन इदनानी,भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी,प्रदेश नेते प्रकाश माखिजा,आणि टीमने महत्वाची भूमिका निभावली. सर्वांना सोबत घेऊन शहराच्या रखडलेल्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com