esakal | पंडित जसराज यांच्यावर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

पंडित जसराज यांच्यावर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अमेरिकेत निधन झाले. त्यांचे पार्थिव अमेरिकेतून खास विमानाने आज दुपारी 11:30 च्या सुमारास मुंबईला त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.

पंडित जसराज यांच्यावर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे


मुंबई ः संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अमेरिकेत निधन झाले. त्यांचे पार्थिव अमेरिकेतून खास विमानाने आज दुपारी 11:30 च्या सुमारास मुंबईला त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. उद्या सकाळी 10:30 ते दुपारी 3 त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल आणि उद्या सायंकाळी पाचच्या सुमारास विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंकार करण्यात येतील.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

    पद्म विभूषण पंडित जसराज यांनी अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे सोमवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर शास्त्रीय संगीतातील एका सूर्याचा अस्त झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. या महान गायकाला पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण या तिन्ही पद्म पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. उद्या अंतिम संस्काराच्या वेळी त्यांना एकवीस तोफांची सलामी देण्यात येणार आहे. तसेच अंधेरी-वर्सोवा ते विलेपार्ले येथील स्मशानभूमीपर्यंत पोलिस एस्कार्टने त्यांचे पार्थिव आणले जाईल आणि त्यानंतर अंतिम संस्कार होतील. आज त्यांच्या वर्सोवा येथील घरी त्यांच्या काही शिष्यांनी तसेच भजनसम्राट अनुप जलोटा यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या मागे पत्नी मधुरा जसराज, मुलगी दुर्गा जसराज व मुलगा शारंग देव व नातवंडे असा परिवार आहे. 

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top