esakal | पंडित जसराज यांचे पार्थिव अनंतात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

पंडित जसराज यांचे पार्थिव अनंतात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे  पार्थिव आज अनंतात विलीन झाले. या महान शास्त्रीय गायकाला अखेरचा निरोप देताना अनेकांचे अश्रू अनावर झाले होते.

पंडित जसराज यांचे पार्थिव अनंतात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे


मुंबई ः संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे  पार्थिव आज अनंतात विलीन झाले. या महान शास्त्रीय गायकाला अखेरचा निरोप देताना अनेकांचे अश्रू अनावर झाले होते. त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचा मुलगा शारंग देवने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. या वेळी स्मशानभूमीत काही ठराविक मंडळी उपस्थित होती.

पंडित जसराज यांचे सोमवारी अमेरिकेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तयांचे पार्थिव काल साडेअकराच्या सुमारास खास विमानाने अमेरिकेतील न्यू जर्सी येथून मुंबईत आणण्यात आले. आज सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या अंधेरी-वर्सोवा येथील घरी ठेवण्यात आले. या वेळी भजनसम्राट अनुप जलोटा, निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गायक कैलाश खेर, तलत अझीज तसेच त्यांचे काही शिष्यगण यांनी अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर तिरंग्यामध्ये गुंडाळलेले त्यांचे पार्थिव साधारण साडेपाचच्या सुमारास विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यावेळी एकवीस तोफांची सलामी देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आले. भजनसम्राट अनुप जलोटा, कैलाश खेर, पंडित शिवकुमार शर्मा, उदित नारायण, श्रेया घोषाल, तलत अझीज या संगीत क्षेत्रातील मंडळींबरोबरच चित्रपटसृष्टीतील मंडळींनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. 

-------------------------------

संपादन - तुषार सोनवणे ः

loading image
go to top