महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी मांडल्या व्यथा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

प्रज्ञा नावाच्या महिलेसोबत बाळ आहे. 'टीव्ही, मोबाईलवर दाखवताहेत आम्हाला मदत मिळतेय. मात्र आमच्यापर्यंत कोणीच पोहोचलेले नाहीय. लहान मुलांना खायला काही नाहीय,' अशी कैफियत त्यांनी मांडली. 

कल्याण : चहुदिशांनी पाणी पाहून महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवासी भेदरून गेले. मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या या एक्स्प्रेसच्या एका बोगीमध्ये साप शिरल्याने आधीच घाबरलेल्या प्रवाशांमध्ये आणखी भीती पसरली. शिवाय, आसपास महापुर पसरलेला असताना प्रवाशांना पिण्यासाठी पाणी नाहीय. तशी माहिती प्रवाशांनी सकाळी‌ ९.३० वाजता प्रसारित केलेल्या व्हिडिओंमध्ये दिली आहे. 

रात्रीपासून रेल्वे पुरात अडकली असल्याचे राजेंद्र केसवाणी यांनी सांगितले. 'अजूनपर्यंत आमच्यापर्यंत कोणतीही मदत आली नाही. प्लीज आम्हाला मदत पाठवा,' असे आवाहन त्यांनी केले. 

आजुबाजूला पूर आहे. आमच्याकडे प्यायला पाणी नाही. या बोगीमध्ये साप घुसला आहे. कृपा करून आम्हाला बाहेर काढा, असे आशा नावाच्या ज्येष्ठ महिलेने सांगितले. 

प्रज्ञा नावाच्या महिलेसोबत बाळ आहे. 'टीव्ही, मोबाईलवर दाखवताहेत आम्हाला मदत मिळतेय. मात्र आमच्यापर्यंत कोणीच पोहोचलेले नाहीय. लहान मुलांना खायला काही नाहीय,' अशी कैफियत त्यांनी मांडली. 

दिलीप मोरे म्हणाले, 'आम्हाला पाण्याची गरज आहे. आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panic wave among stranded Mahalakshmi Express passangers