दादरमधील ‘पणशीकर स्वीट्स’ आठवड्यापासून बंद

File Photo
File Photo

मुंबई : थंडगार पियूष, नरम पेठा, श्रीखंड आणि अन्य गोड पदार्थांनी अनेक वर्षांपासून दादरकरांना तृप्त करणारे पणशीकर मिठाईचे दुकान आठवड्यापासून बंद आहे. न. चिं. केळकर मार्गावरील हनुमान मंदिरानजीकच्या या मिष्टान्न भांडारात सणासुदीला ग्राहकांच्या रांगा लागत होत्या.

दादरमधील मराठमोळे मिठाईचे दुकान म्हणून विख्यात असलेल्या ‘पणशीकर’ येथे गुढीपाडवा, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आदी सणांच्या दिवशी मिठाई आणि श्रीखंड खरेदीसाठी गर्दी उसळत असे. दादर रेल्वेस्थानकाजवळ आणि मुख्य रस्त्याला लागून असल्यामुळे या मिष्टान्न भांडारात ग्राहकांचा सतत राबता असायचा. त्यामुळे हे दुकान बंद झाल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

पणशीकर मिठाई दुकान असलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे दुकान बंद करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. दुकान बंद करण्यात येत असल्याची नोटीस १० दिवसांपूर्वी लावण्यात आली होती, अशी माहिती तेथील फेरीवाल्यांनी दिली. मुंबईचे मराठीपण टिकवून ठेवणारी दुकाने व उपाहारगृहे एकामागून एक बंद होत आहेत. त्यात दादर पश्‍चिमेकडील ‘पणशीकर मिठाई’चाही समावेश झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com