पंकजा यांनी घेतली भुजबळ यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आज लिलावती रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे उपस्थित होत्या. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी काही दिवस सांताक्रूझ येथील निवासस्थानी आराम घेतला. या वेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
Web Title: pankaja munde meet to chhagan bhujbal politics