पंकजा मुंडेंच्या कार्यालयास "आयएसओ'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

मुंबई - उत्कृष्ट प्रशासन, सुसूत्रता तसेच जन कल्याणकारी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयातील कार्यालयाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे मंत्री कार्यालयाच्या शिरपेचात बहुमानाचा तुरा खोवल्याची भावना कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्‍त केली. पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास विभागाचा कारभार मंत्रालयातील चौथ्या मजल्यावरून चालतो. इतर मंत्र्यांच्या तुलनेत या दालनात नेहमीच सर्व सामान्य नागरिकांची मोठी गर्दी असते. पंकजा मुंडे यांनी आलेल्या प्रत्येकांची कामे सुलभरीतीने व्हावीत यासाठी स्वतः लक्ष घालून कर्मचाऱ्यांना कामाचे नियोजन करून दिले शिवाय कार्यालयात त्यांनी शिस्तीला महत्त्व दिल्याचे सांगितले जाते. कार्यालयात भेटीसाठी आलेल्या अभ्यागतांची नोंद घेण्यापासून ते त्यांच्या कामांचा पाठपुरावा करण्यापर्यंत, तसेच वेळेत कामाचा निपटारा करण्याकडे जातीने लक्ष दिले जाते.
Web Title: Pankaja Munde Office ISO