पनवेलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. भाजप आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे.

पनवेल : नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. भाजप आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार एकूण 78 जागांपैकी 61 जागांचे कल समोर आले आहेत. त्यापैकी तब्बल 51 जागांवर भाजपने आघाडी मिळविल आहे. तर शेकापला केवळ 17 जागांवर आघाडी मिळविली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या कलामध्ये इतर कोणत्याही पक्षाला एकाही जागेवर आघाडी मिळविता आलेली नाही. पहिल्यांदाच झालेल्या पनवेल महापालिकेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची, शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसाठी अस्तित्वाची तर शिवसेनेसाठी चाचपणी ठरली. भाजपने रिपाईसोबत युती करत निवडणूक लढविली. स्पष्ट बहुतम मिळाल्याने भाजपने प्रतिष्ठा राखली आहे.

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा:
 
आणखी ताज्या बातम्या वाचा:
 
Web Title: panvel election, panvel news, bhiwandi news, malegaon news, election results, corporation election result bjp ramseth thakur prashant thakur