फेसबुकवर मैत्री करून महिलेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

पनवेल - पनवेलमध्ये राहणाऱ्या 32 वर्षांच्या विवाहित महिलेशी फेसबुकद्वारे मैत्री करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संदीपचंद्र ऊर्फ कुणाल खन्ना असे या आरोपीचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी हा गुन्हा उत्तर प्रदेश पोलिसांकडे वर्ग करून आरोपीला त्यांच्या स्वाधीन केले आहे.

पीडित महिला उत्तर प्रदेशात राहायला जाणार होती. 2003 मध्ये तिचे लग्न झाले असून, तिला एक मुलगा आहे. पतीसोबत काही कारणास्तव वाद झाल्याने काही वर्षांपासून ती नोकरीनिमित्त पनवेलमध्ये वेगळी राहत होती. वर्षभरापूर्वी फेसबुकद्वारे तिची संदीपचंद्र खन्नाशी ओळख झाली. संदीपचंद्रने तो कानपूरच्या बॅंक ऑफ बडोदामध्ये व्यवस्थापक असल्याचे तिला सांगितले. लग्नाच्या भूलथापा देत त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. तिच्या मुलाला सांभाळण्याचेही आश्‍वासन दिले. नोकरी लावण्यासाठी तिच्याकडून वारंवार पैसे उकळले. अशाप्रकारे सुमारे 10 लाख रुपयांना गंडा घातल्याची तक्रार पीडितेने केली आहे.

Web Title: panvel mumbai news Atrocity on women