शंभर किलो गांजा पनवेलमध्ये जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

पनवेल - गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत पनवेलमधून शंभर किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

पनवेल - गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत पनवेलमधून शंभर किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

पनवेल-मुंब्रा मार्गावर गुन्हे शाखा 10च्या पोलिसांनी एका कारमधून हा गांजा जप्त केला. तिन्ही आरोपी मुंब्य्राचे रहिवासी असून, जप्त केलेला गांजा त्यांनी आंध्र प्रदेशातून आणला होता. गुन्हे शाखेला पनवेल-मुंब्रा मार्गावर कारमधून गांजा नेला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिस नाईक किरण राऊत यांना मिळाली होती. राऊत यांनी वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. दरम्यान, कारमध्ये गोणीमध्ये भरलेला गांजा सापडला.

Web Title: panvel mumbai news ganja seized