पनवेल : किरकोळ वादातून तरुणाची हत्या

पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे
Mumbai
Mumbaisakal

पनवेल : रेल्वे (Railway) स्थानक परिसरात राहणाऱ्या तरुणाने किरकोळ कारणावरून एकावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकिस आली आहे. कुमार तिप्पा रेड्डी (३२) असे आरोपी तरुणाचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Mumbai
सोलापूर : वाहून जाताना ग्रामस्थांनी वाचवले तरुणाचे प्राण

तर मयत तरुणाचे नाव शब्बीर मोहम्मद शेख (२३) आहे. दोघे एकमेकांच्या परिचयाचे होते. शनिवारी शब्बीर शेख आणि कुमार रेड्डी यांच्यात किरकोळ वाद झाला. यावेळी रेड्डीने शब्बीर शेख याच्यावर टोकदार वस्तूने हल्ला केला. यात शेख गंभीर जखमी होऊन काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी कुमार रेड्डी याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com