पनवेलच्या आयुक्तांवर "अविश्‍वास'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

पनवेल - पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या विरोधात पालिकेतील सत्ताधारी भाजपने आणलेला अविश्‍वासाचा ठराव आज 50 विरुद्ध 22 मतांनी मंजूर झाला. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सभागृहात शिंदेंविरोधात मांडलेल्या अविश्‍वास ठरावाच्या बाजूने भाजप नगरसेवकांनी, तर शेकाप-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी त्याविरोधात मतदान केले.

पारदर्शक कारभाराने भाजपच्या नाकी नऊ आणलेल्या शिंदेंविरोधात भाजपने सुरवातीपासूनच दंड थोपटले होते. चढ्या कंत्राटांवर चालवलेली कात्री, आधीच्या कामांची मुदतीमधील देयके, घनकचरा हस्तांतराला खो देऊन मलिदा कमावणाऱ्यांना दणका, या मुद्द्यांमुळे भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदे यांनी वाहन खरेदी व पालिकेच्या वर्धापनदिनाच्या आलिशान कार्यक्रमाच्या नावावर होणारी लाखो रुपयांची उधळण रोखली होती. त्यामुळे क्षुल्लक कारणांवरून शिंदे यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू होते.

शिंदेंच्या बदलीसाठी पनवेलमधील भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गळ घातली होती; मात्र ते प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. अखेर शिंदे यांना हटवण्यासाठी सोमवारी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत हा अविश्‍वास ठराव मांडला. पालिकेत मंजूर झालेला ठराव पालिका सचिवांमार्फत मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठवला जाणार आहे.

Web Title: panvel news commissioner dr. sudhakar shinde Unbelief