पनवेलमध्ये स्वाईन फ्लू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

कामोठे - पनवेलच्या ग्रामीण भागात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर साथीच्या आजारांबाबत खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने जागृती मोहीम सुरू केली आहे. 

कामोठे - पनवेलच्या ग्रामीण भागात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर साथीच्या आजारांबाबत खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने जागृती मोहीम सुरू केली आहे. 

पनवेलमधील नागरिकांचे वातावरण बदल आणि साथीचे आजार यामुळे आरोग्य बिघडले आहे. पनवेलच्या ग्रामीण भागात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले आहेत. नवीन पनवेल, कामोठे, खारघर या ठिकाणीही प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. स्वाईन फ्लूचे ३० संशयित रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल झाले होते. उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, असे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयात १५० गर्भवतींना साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करण्यात आले आहे.

Web Title: panvel news swine flu