फुटलेल्या जलवाहिनीने घेतला महिलेचा बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नवीन पनवेल - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या फुटलेल्या जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर साचल्याने बुधवारी एका महिलेचा बळी गेला. खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला.

नवीन पनवेल - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या फुटलेल्या जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर साचल्याने बुधवारी एका महिलेचा बळी गेला. खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला.

सुजाता पाटील (वय 31; रा. वाघिवली, पनवेल) असे मृत महिलेचे नाव आहे. चिंचपाडा तलावपाळी येथे सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. भोकर पाडा येथील जवाहरलाल नेहरू जलशुद्धीकरण केंद्र ते जेएनपीटी-पनवेलदरम्यान 30 वर्षांपूर्वी 115 दशलक्ष लिटरची (एमएलडी) जलवाहिनी टाकण्यात आली होती.

चिंचपाडा वडघरनजीकच्या फुटलेल्या वाहिनीमुळे तलावपाळी येथील रस्ता पाण्याखाली गेला आहे.

Web Title: panvel news women death by leakage waterline