पनवेलमधल्या 'त्या' घटनेनंतर ठाकरे सरकारला जाग, घेतला मोठा निर्णय

पूजा विचारे
Sunday, 19 July 2020

ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे प्रत्येक गावात आता कोविड-१९ दक्षता समित्या स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारनं घेतल्याचं समोर आलं आहे. पनवेल क्वारंटाईन सेंटर मधील घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय. 

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे प्रत्येक गावात आता कोविड-१९ दक्षता समित्या स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारनं घेतल्याचं समोर आलं आहे. पनवेल क्वारंटाईन सेंटर मधील घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय. 

महिला रुग्णांसाठी महिला पोलिस सुरक्षा तैनात करणार असून सेंटर्समध्ये सीसीटीव्हीही लावण्यात येणार आहे. पनवेलमधल्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी सर्व राज्यातला आढावा घेण्यात आला. या बैठकीत आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

अधिक वाचाः  'त्या' हत्येप्रकरणातले आरोपी तब्बल एक महिन्यानंतर गजाआड

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राजेश टोपेंनी माहिती दिली की,  या बैठकीत राज्यातल्या कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला असून सगळी परिस्थिती लक्षात घेऊन काही निर्णय घेतलेत. त्यात राज्यात यापुढे लॉकडाऊनची वेळ न आणता टप्याटप्याने दैनंदिन व्यव्हार सुरळीत कसे होतील याकडे सरकारचा कल असेल, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. 

तसंच राज्यात आता जिल्हा स्तरावर जसे टास्क फोर्स आहेत तसेच आता डेथ ऑडिट कमिटी निर्माण करणार असल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय.  राज्यातील प्रत्येक गावांत आता कोविड दक्षता समिती स्थापन करणार असल्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतलाय. 

हेही वाचाः प्रतिबंधित क्षेत्र, नवीन मार्ग सर्व माहिती एका क्लिकवर; उबरच्या एॅपमध्ये आता मिळणार कोविडची माहिती

काय घडलं पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये 

पनवेल येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.  या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. पीडित महिला ४० वर्षीय आहे तर आरोपी २५ वर्षीय आहे. पीडित महिला आणि आरोपी तरुण हे दोघेही नवी मुंबईतच राहणारे आहेत. 

एएनआय न्यूज एजन्सीने ट्वीट केलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की आरोपी तरुणावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर ३५४ (विनयभंग) आणि ३७६ (बलात्कार) कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

panvel rape case maharashtra government took new decision covid vigilance committees


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: panvel rape case maharashtra government took new decision covid vigilance committees