अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पुण्यातून अटक 

file photo
file photo

मुंबई : पनवेलच्या भंगारपाडा परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला पनवेल पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. प्रेम सुभाष चव्हाण (19) असे या तरुणाचे नाव असून, न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. 

घटनेतील अल्पवयीन मुलगी व आरोपी प्रेम चव्हाण या दोघांचे कुटुंबीय कामानिमित्त नवी मुंबईत आले आहेत. त्यामुळे याच परिचयाचा फायदा घेऊन आरोपी प्रेम चव्हाण याने मे महिन्यात पीडित मुलीवर अत्याचार केला होता. मात्र या आठवड्यात पीडित मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी केलेल्या तपासणीत पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रेम चव्हाण याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पनवेल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांकडून आरोपी प्रेम चव्हाणवर बलात्कारासह पोक्‍सो व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्याने आरोपी फरारी झाला होता. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुनील तारमळे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून अाणि खबऱ्यांद्वारे माहिती काढून पुणे शिवाजीनगर येथील सेंच्युरियन हॉटेलमधून प्रेमला ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपी प्रेम चव्हाण याला पोलिस कोठडी ठोठावल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पवन भंगारदिवे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com