पनवेल आगारात संपाला काही प्रमाणात प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पनवेल- एसटी कर्मचाऱ्यांनी रात्री पासुन सुरु केलेल्या संपाचा परिणाम पनवेल एसटी आगारात काही प्रमाणात पाहायला मिळाला. रांज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून सुरु केलेल्या कामबंद आंदोलनात पनवेल आगारीतील कर्मचारिही सामील झाले आहेत. वेतनवाढीच्या मुख्य मागणीसह अन्य इतर मागण्यांसाठी हा बंद पुकारला गेला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेतनवाढ नाकारल्याने हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन या बंदची हाक दिली आहे. 

पण एसटी कर्मचाऱ्यांच्या या बंदची कोणतीही पूर्वकल्पना प्रवाशांना नसल्याने त्यांची मात्र मोठी गैरसोय झाल्याचे पनवेल आगारात पाहायला मिळाले आहे. राज्यातील विवीध एसटी आगारातील कर्मचाऱ्यांऩी मध्यरात्रीपासूनच कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्या मधे पनवेल आगारातीलही काही कर्मचार्यांचा समावेश आहे. त्यामुळे पनवेल आगारातुन सुटणार्या अनेक एसटी रद्द करण्यात आल्या यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. दरम्यान या बाबत पनवेल एसटी आगार व्यवस्थापक सुनील पवार यांच्याशी संपर्क साधला असता, पनवेल आगारातुन पंन्नास टक्के एसटी सुरु असल्याची माहीती त्यांनी दिली पनवेल आगारातुन लांब पल्याच्या काही एसटी बस सोबतच डोंबीवली, दादर, पेन, अलिबाग आणि ठाणे परीसरात जाणाऱ्या बस सोडण्यात आल्याची माहिती देताना पनवेल आगारातील फक्त पस्तिस ते चाळीस टक्केच कर्मचारी संपात सामील असल्याच पवार यांचे म्हणणे आहे.

पोलीस बंदोबस्त
बंद दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडु नये या करता आगारात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दुपारनंतर शुकशुकाट
एसटी कर्मचाऱ्यांच्या बंदची माहिती दुपार पर्यंत प्रवाशांना मिळाल्याने मिळेल त्या वाहनांनी प्रवाशांनी प्रवास करण्यास पसंती दिली. यामुळे दुपारनंतर पनवेल आगारात प्रवाशांची संख्या नेहमी पेक्षा कमी दिसत होती.

पनवेल आगार व्यवस्थापक पवार यांनी आगारातुन पंन्नास टक्के वाहतुक सुरु असल्याचा दावा केला असला तरी कर्मचार्यांनी मात्र पवार यांचा दावा फेटाळला असुन, आगारातील 80 टक्के वाबतुक बंद असल्याच कर्मचार्यांच म्हणन आहे. जे काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत त्यांच्यावर वरिष्ठांनी दबाव टाकल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पनवेल आगारात संपाचा जास्त परिणाम झाला नाही.  पंन्नास टक्के फेऱ्या सुरु आहेत. पनवेल आगारातील फक्त चाळीस टक्के कर्मचारी संपात सामील झाले आहेत.
- सुनील पवार, आगार व्यवस्थापक

सरकारने जी काही पगार वाढ जाहिर केली आहे. ती कर्मचाऱ्यांना मांन्य नाही. कर्मचारी संघटणांनी पगाराचे जे सूत्र सरकार डे दिले त्या नुसार पगार वाढ झाली पाहीजे.
- रघुणाथ गाडे, कर्मचारी, पनवेल आगार
 
Web Title: Panvel : Response to stike some extent