पनवेलमधील घरांची गिरणी कामगारांना प्रतीक्षा ; अनेक विजेत्यांचा मुंबईतील घरांवर दावा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पनवेल तालुक्‍यातील कोन येथील 2,417 सदनिकांची सोडत 2 डिसेंबर 2016 रोजी काढण्यात आली. या सोडतीमध्ये विजेते ठरलेल्या कामगारांकडून म्हाडाने कागदपत्रे मागवून त्यांची पात्रता निश्‍चित केली आहे.

मुंबई : पनवेल तालुक्‍यातील कोन येथील 2,417 सदनिकांची गिरणी कामगारांसाठीची सोडत म्हाडामार्फत डिसेंबर 2016 मध्ये काढण्यात आली. या सोडतीमधील विजेते कामगार अद्यापही या घरांच्या प्रतीक्षेत आहेत. सोडतीमध्ये विजेते ठरलेल्या सुमारे 314 कामगारांनी मुंबईतील गिरण्यांच्या जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या घरांवर दावा केला आहे. या कामगारांकडून पसंती अर्ज भरून घेण्याचा विचार म्हाडा अधिकारी करत आहेत. 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पनवेल तालुक्‍यातील कोन येथील 2,417 सदनिकांची सोडत 2 डिसेंबर 2016 रोजी काढण्यात आली. या सोडतीमध्ये विजेते ठरलेल्या कामगारांकडून म्हाडाने कागदपत्रे मागवून त्यांची पात्रता निश्‍चित केली आहे.

पात्र झालेले कामगार गिरण्यांच्या जमिनीवर बांधकाम सुरू असलेल्या गिरण्यांमध्ये काम करत होते. त्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या इमारतींमधील घरांसाठी या सोडतीत पात्र झालेल्या 314 कामगारांनी दावा केला आहे. यामुळे कोन येथील घरांचा ताबा देण्याबाबतची प्रक्रिया थांबली आहे. 

लवकरच अंतिम निर्णय 

ज्या गिरण्यांमध्ये कामगार कामाला होते. त्या गिरण्यांच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी संबंधित कामगार आणि त्यांच्या वारसांची सोडत काढण्यात येते. त्यामुळे पुढील वर्षात तयार होणाऱ्या या घरांसाठी अनेक कामगार इच्छुक असल्याने त्यांच्याकडून पसंतीक्रम अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.

ज्या कामगारांना पनवेल येथील घरे हवी आहेत, त्यांनी अर्ज क्रमांक 1 तर ज्यांना मुंबईतील घरे हवी आहेत त्यांच्याकडून दोन क्रमांकाचा अर्ज भरून घेण्याचा विचार म्हाडा अधिकारी करत आहेत. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे म्हाडातील अधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: Panvel servant waiting their own Homes