फलकांवर मोदींसोबत पप्पू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - आजवर गुंड म्हणून हिणवणाऱ्या पपू कलानीला भाजपने फलकांवर मोदींसोबत स्थान दिल्यामुळे उल्हासनगरमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उल्हासनगर - आजवर गुंड म्हणून हिणवणाऱ्या पपू कलानीला भाजपने फलकांवर मोदींसोबत स्थान दिल्यामुळे उल्हासनगरमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उल्हासनगर डेव्हलपमेंट अलायन्स ७८ पैकी तब्बल ७० जागा एकत्रित लढवत आहेत. विशेष म्हणजे पप्पू कलानी यांना टाडा आरोपी, गुंडांचा बादशाह असे हिणवणाऱ्या भाजपच्या फलकांवर पप्पू कलानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्थान दिले आहे. यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उल्हासनगरमध्ये पप्पू कलानीला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे मतांच्या जोगव्यासाठी त्यांच्यावर रचलेले गाणे वाजवून मतदारांना आकृष्ट करण्याचा फंडा यूडीएने वापरला आहे. पप्पू कलानीमुळे उल्हासनगरची ओळख सर्वत्र सांगितली जाते. आजघडीला कलानी तुरुंगामध्ये असले तरी भाजप असो की राष्ट्रवादी किंवा टीम ओमी कलानी बहुतांशांच्या पॅनेलमध्ये ‘केर आयो पप्पू शेर आयो, जिओ जिओ जिओ जिओ पप्पू कलानी’ हे गाणे गुंजत आहे.

एकंदरीत पप्पू कलानीच्या नावाचा किंवा गाण्याचा वापर करणे हेच विजयाचे गणित ठरू शकते, अशी धारणा विशेषतः उल्हासनगरातील भाजपची आहे.

Web Title: Pappu on the panel along with Modi