परळ रेल्वेस्थानकातील पुलाचे काम वेगाने करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुंबई - परळ रेल्वेस्थानकातील प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे तेथे अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील पादचारी पुलाच्या पायऱ्या युद्धपातळीवर बसवा, असे आदेश रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समितीने रेल्वे प्रशासनाला सोमवारी (ता.19) दिले.

मुंबई - परळ रेल्वेस्थानकातील प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे तेथे अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील पादचारी पुलाच्या पायऱ्या युद्धपातळीवर बसवा, असे आदेश रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समितीने रेल्वे प्रशासनाला सोमवारी (ता.19) दिले.

सर्वाधिक गर्दीच्या परळ स्थानकातील पादचारी पुलाच्या दुरवस्थेबाबत प्रवासी सुविधा समितीने नाराजी व्यक्त केली. समितीच्या सदस्यांनी सोमवारी मध्य रेल्वेच्या परळ व कुर्ला स्थानकाची पाहणी केली. समितीचे सदस्य डॉ. अशोक त्रिपाठी व मोहम्मद इरफान यांच्यासह मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही स्थानकांतील सेवासुविधांची पाहणी केली.

परळ स्थानकातील पादचारी पुलाची दुरवस्था पाहिल्यानंतर समितीच्या सदस्यांनी त्याची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश दिले. "प्रतिदिन एक लाखाहून अधिक प्रवासी परळ स्थानकातून ये-जा करतात; परंतु तेथील सेवासुविधा मात्र अत्यल्प आहेत. गर्दीच्या वेळी पादचारी पुलावर चढण्यासाठी 15 मिनिटांहून अधिक वेळ लागतो. त्याची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे, तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले. दोन आठवड्यापासून परळ स्थानकातील पायऱ्या बदलण्याचे काम सुरू आहे. मध्यरात्री हे काम करण्यात येत आहे.

अभियंता, कंत्राटदाराला दंड
कुर्ला स्थानकातील पंखे व दिवे बंद असल्याने विद्युत अभियंत्याला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच स्थानकातील शौचालयात अस्वच्छता असल्याने कंत्राटदाराला पाच हजारांचा दंड ठोठावल्याचे डॉ. अशोक त्रिपाठी यांनी सांगितले.

Web Title: paral railway station bridge work