फीवाढी विरोधात पालकांचा आज एल्गार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

मुंबई - फीवाढीच्या विरोधात पालक रविवारी (ता. 20) सकाळी 11 वाजता आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. यापूर्वीही पालकांनी आझाद मैदानात फीवाढी विरोधात आंदोलन केले होते. त्या वेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काही शाळांमधील फी वाढ नियंत्रणात ठेवण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते त्यांनी पाळले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

विद्यार्थ्यांनी फी न दिल्याने माहीमच्या सरस्वती स्कूलमध्ये मुलांना वर्गात प्रवेश न देण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे पालकांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. पालकांचे उद्याचे आंदोलन "फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन' या संस्थेच्या नेतृत्वाखाली होणार आहे. मिस्ड कॉल देऊन फीवाढीला विरोध करा, असे आवाहन संस्थेने केले आहे. आतापर्यंत तीन हजार मिस्ड कॉल आल्याचे संस्थेचे प्रमुख जयंत जैन यांनी सांगितले.

Web Title: parents elgar ffor fee increase oppose