esakal | शिक्षण विभागाचे तुघलकी फर्मान; तक्रारीसाठी 'असा' करावा लागणार अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

School

शिक्षण विभागाचे तुघलकी फर्मान; तक्रारीसाठी 'असा' करावा लागणार अर्ज

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : शाळांच्या विरोधात तक्रार (School complaints) करण्यासाठी आता पालकांना (parents) शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्ज (Stamp paper) करून आपली माहिती द्यावी लागणार आहे. यासाठीचे तुघलकी फर्मान शालेय शिक्षण विभागाच्या अपर सचिवांनी (upper secretary) काढले असून याविरोधात राज्यभरात पालक संघटनांकडून (Parents Union) संताप व्यक्त केला जात आहे. ( parents letter should on stamp paper For School Complaints says Education Authorirties-nss91)

25 टक्के पालकांकडून 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर स्वतंत्र अर्ज प्राप्त करून घ्यावे व त्यानंतर सदर प्रकरण संबंधित विभागीय शुल्क निर्धारण समितीकडे सुनावणीसाठी पाठवावे असे या आदेशात सचिवानी म्हटले आहे. यावर पालक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 25 टक्के पालकांकडून स्टॅम्प पेपर वर अर्ज करून घेण्यापूर्वी शिक्षण सचिवांनी किती खाजगी शाळांच्या ऑडिट रिपोर्टची माहिती घेतली, अथवा मनमानी शुल्क वसूल करणाऱ्या किती शाळांवर मान्यता काढून घेण्याची कारवाई केली ही माहिती त्यांनी द्यावी, अशी मागणी इंडिया वाईट पॅरेण्ट असोसिएशनच्या वकील अनुभा सहाय यांनी केली आहे.

हेही वाचा: Maharashtra Flood : विद्यार्थ्यांना दिलासा, 'या' परीक्षेसाठी एक संधी

पालक वर्षभर मनमानी शुल्क करणाऱ्या शाळांच्या विरोधात आंदोलने करत असून त्या शाळांवर कडक कारवाई करण्याऐवजी पालकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासारखा हा स्टॅम्प पेपरवर अर्ज करण्याचा प्रकार असल्याचा आरोप पालक संघटनेचे प्रसाद तूळसकर यांनी केला आहे. विभागीय शुल्क नियामक समित्या व विभागीय तक्रार निवारण समित्या यांच्या कामकाजासंदर्भात काढलेल्या या तुघलकी फर्मानमध्ये शिक्षण सचिवांनी अनेक दावे केले आहेत.

यात त्यांनी काही शाळांनी न्यायालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या आदेशावर स्थगिती आणली, तसेच शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरला. काही शाळांची एनओसी रद्द करण्याचा आग्रह धरला असून अशा प्रकारचे गुंतागुंतीचे प्रकरणे विभागीय शुल्क निर्धारण समिती यांच्याकडे पाठवावेत आणि अशा प्रकरणासाठी 25 टक्के पालकांचे अर्ज प्राप्त झाले नसतील तर अर्जदारांना मार्फत संबंधित पालकांना अर्ज करण्यासाठी सुचवावे अशा सूचना सचिवांनी दिल्या आहेत.

पालक संघटनांच्या अधिकारावर गदा

सचिवांनी काढलेल्या या देशांमध्ये पालक संघटनांच्या अधिकारावर गदा आणण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक नसताना किंवा संबंधित शाळेत त्यांचा एकही अपत्य नसताना इतर पालकांचे नेतृत्व दाखवून काही जण तक्रारी घेऊन येतात, असा बेशिस्तपणे, गैरशिस्तीने वागतात व अधिकाऱ्यांवर दबाव आणतात, असा दावा सचिवांनी केला असून यातून संघटना मज्जाव करण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आल्याचा आरोप पालक संघटनांच्या प्रतिनिधीकडून करण्यात आला आहे

loading image
go to top