पालकांनी ठोकले शाळेला टाळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

मोखाडा : आपले मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊन साक्षर व्हावीत, म्हणून जोगलवाडी येथील आदिवासींनी मुलांना शाळेत पाठवलं आहे. मात्र, गेली दहा महिन्यांपासून येथे वारंवार मागणी करूनही मोखाडा शिक्षण विभागाने शिक्षक दिलेला नाही.1 ते 5 वी चे वर्ग एक शिक्षक वर्ष भरापासुन सांभाळत आहे. त्यामुळे संतापलेल्या आदिवासी पालकांनी शाळेला टाळे ठोकले आहे. त्यामुळे तालुक्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. 

मोखाडा तालुक्यातील जोगलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 1 ते 5 वी पर्यंत वर्ग असुन, 45 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनाच्या धोरणानुसार 44 पटसंख्या असलेल्या शाळेला दोन शिक्षक देणे अनिवार्य आहे. मात्र, मागील वर्षापासून येथे एक शिक्षक 1 ते  5 वर्ग एका इमारती मध्ये भरवून ज्ञानार्जनाचे काम करित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. येथे दोन इमारती आहे. परंतु, शिक्षक नसल्याने एका ईमारत बंद करून ठेवली आहे.

आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, येथील पालक तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती गेली दहा महिन्यापासुन एका शिक्षक मिळावा म्हणून मागणी करत आहेत. त्यासाठी त्यांनी मोखाडा पंचायत समितीचे ऊंबरठे झिजवले आहेत. पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ, गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांच्या सह गटशिक्षण अधिकारी यांची अनेकदा भेट घेऊन निवेदने दिली असल्याचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर जोशी यांनी सांगितले आहे. 

निवेदन आणि भेटी घेऊन ही काही च कार्यवाही होत नसल्याने, अखेर संतप्त झालेल्या पालकांनी आणि स्थानिक व्यवस्थापन समितीने शाळेतच बैठक घेऊन एकमुखी निर्णय घेत 26 जूनला शाळेला टाळे ठोकले आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर जोशी, अनंता गवारी, हरीश सारक्ते, मीना गोंदके, कुसुम गोंदे, शोभा गवारी यांसह विलास भोरूंडे व विद्यार्थी ऊपस्थित होते. विशेष म्हणजे शाळेला टाळे ठोकल्यानंतरही दोन दिवस येथे कोणताच अधिकारी आणि पदाधिकारी फिरकलेला नाही. 

Web Title: parents lock the school