प्रिन्सच्या पालकांना मिळणार 10 लाख रुपये नुकसान भरपाई

प्रिन्सच्या पालकांना मिळणार 10 लाख रुपये नुकसान भरपाई

मुंबई :  केईएम रुग्णालयाच्या ईसीजी यंत्रणेत बिघाड होऊन हात आणि कान भाजलेल्या प्रिन्स राजभर या बालकाच्या पालकांना १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा निर्णय आज गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.  राजेश मारू याच्या वारसानाही १० लाखाची नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच महापालिकेच्या चुकीमुळे विविध दुर्घटनांमध्ये जखमी किंवा मृत होणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत पॉलिसी बनविण्यात येणार असल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

केईएम रुग्णालयात  उपचार चालू असताना प्रिन्स २२ टक्के भाजला आहे. त्यात त्याला संसर्ग झाल्याने त्याचा हात कापून काढावा लागला. तर कान आणि डोक्‍याचा भागही भाजला आहे. त्यामुळे त्या मुलाच्या पालकांना पालिकेने तातडीने १० लाख रुपये देण्याची मागणी स्थायी समिती बैठकीपाठोपाठ पालिका सभागृहात सर्वपक्षीय गटनेते आणि नगरसेवकांनी केली होती. मात्र प्रशासनाने त्याच्या पालकांना पाच लाख रुपये देऊ केले होते. त्यांनी ते प्रशासनाकडे परत केले होते. याबाबत बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत पुन्हा चर्चा करण्यात आली. सर्व पक्षीय गटनेत्यांच्या दबावामुळे प्रशासनाला प्रिन्सच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. सध्या ५ लाख रुपये प्रिन्सच्या कुटुंबियांना दिले जाणार असून ५ लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले जाणार आहेत. त्यामधून मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून प्रिन्सवर उपचार आणि शिक्षणाचा खर्च केला जाईल, असे महापौरांनी सांगितले.

राजेश मारू याच्या वारसानाही १० लाख

नायर रुग्णालयात उपचार घेताना एमआरआय मशीनमध्ये अडकून वर्षभरापूर्वी राजेश मारू याचा मृत्यू झाला होता. त्याच्या वारसानाही 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नुकसान भरपाईचे धोरण बनवणार

मुंबईत नाल्यात पडून, झाडे पडून, खड्ड्यात पडून अनेकांचे मृत्यू होतात. या दुर्घटना पालिकेच्या चुकीमुळे झाल्याचे निदर्शनास आल्यास मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत केली जावी अशी मागणी केली जाते. अशी आर्थिक मदत करता यावी, प्रिन्स व राजेश मारू यांच्या सारख्या दुर्घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता यावी म्हणून पॉलिसी बनवण्याचा निर्णय आज गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दुर्घटना घडल्यावर राज्य सरकार, रेल्वे, विमान कंपन्यांकडून ज्या प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते, त्याच धर्तीवर आर्थिक मदत करता यावी अशी पॉलिसी बनवून गटनेत्यांच्या बैठकीत सादर करावी असे निर्देश दिल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

Webtitle : parents of prince will get ten lakh rupees

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com