विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी पालकांनीही पुढाकार घ्यावाः संजय ससाणे

रविंद्र खरात
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

कल्याण: बेकायदा आणि नियम बाह्य शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालका विरोधात आरटीओच्या विशेष पथकामार्फत धडक कारवाई सुरू केली असून, विद्यार्थी वर्गाचा घर ते शाळा हा प्रवास सुरक्षित होतो की नाही, जशी सरकारी यंत्रणेची आहे. तशी पालकांची ही जबाबदारी असून, याबाबत पालकांनी ही पुढाकार घेण्याचे आवाहन कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले.

कल्याण: बेकायदा आणि नियम बाह्य शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालका विरोधात आरटीओच्या विशेष पथकामार्फत धडक कारवाई सुरू केली असून, विद्यार्थी वर्गाचा घर ते शाळा हा प्रवास सुरक्षित होतो की नाही, जशी सरकारी यंत्रणेची आहे. तशी पालकांची ही जबाबदारी असून, याबाबत पालकांनी ही पुढाकार घेण्याचे आवाहन कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले.

शाळकरी विद्यार्थी वर्गाचा सुरक्षित प्रवास बाबत राज्य शासनाने 2012 मध्ये नियमावली अंमलात आणली असून, त्यात राज्य, जिल्हा, शालेय स्तरीय परिवहन समिती रचना, कार्य व जबाबदारी नमूद करण्यात आल्या आहेत. याधर्तीवर कल्याण आरटीओ मार्फत जनप्रबोधन, जनजागृती करण्यात आली असून, आता नियम मोडणाऱ्या विरोधात मोहीम सुरु केली आहे. खासगी बस, रिक्षा, खासगी वाहन मार्फत शाळकरी विद्यार्थ्यांची प्रवासी वाहतूक केली जाते, त्यात अनेक नियम बाह्य वाहतूक करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी दिले आहेत.

एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत एकूण 420 बसेसची तपासणी करण्यात आली. एकूण 66 दोषी वाहनावर कारवाई करण्यात आली असून, त्यातील 7 वाहने अटकावूण ठेवले आहेत. एकूण 5 लाख 52 हजार 480 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहेत. 470 खासगी वाहनाची तपासणी करण्यात आली असून, 75 दोषी वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 5 वाहने अटकावून ठेवले असून, 2 लाख 88 हजार 785 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहेत. 417 रिक्षांची तपासणी करण्यात आली असून, 68 वाहनावर कारवाई करण्यात आली असून, एकूण 1 लाख 48 हजार 300 रुपये तडजोड शुल्क वसूल केले आहे.

एप्रिल 2018 ते जून 2018 या कालावधीत एकूण 82 बसेस तपासणी केली आहे. 12 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, 16 हजार 536 तडजोड शुल्क वसूल करण्यात आले तर 125 खासगी वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात 20 दोषी वाहनावर कारवाई यात 27 हजार 961 रुपये तडजोड शुल्क वसूल तर 272 रिक्षांची तपासणी करत 43 दोषी रिक्षावर कारवाई करत 32 हजार 700 रुपये तडजोड शुल्क वसूल केली आहे. शाळकरी विद्यार्थी सुरक्षित प्रवास बाबत आरटीओ, वाहतूक पोलिस, शाळा, शिक्षक जेवढे जबाबदार आहेत त्यांना प्रबोधन केले जाते आणि वाहन चालकांना ही समझ आणि कारवाई केले जातात यासाठी पालकांनी ही पुढाकार घ्यावा, असे आवाहन कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले. याबाबत नियमावली साठी आरटीओ अथवा शाळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन यावेळी ससाणे यांनी केले.

Web Title: Parents should take initiative for safe journey of students: Sanjay Sasane