पार्किंग शुल्क चौपट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

मुंबई - फोर्ट, कुलाबा परिसरातील 18 वाहनतळांवर महापालिकेने रविवार (ता. 2)पासून नव्या धोरणानुसार शुल्कआकारणी सुरू केली. पूर्वी चारचाकी वाहन तासभर उभे करण्यासाठी 15 रुपये लागत होते. आता त्यासाठी 60 रुपये मोजावे लागतील. 

मुंबई - फोर्ट, कुलाबा परिसरातील 18 वाहनतळांवर महापालिकेने रविवार (ता. 2)पासून नव्या धोरणानुसार शुल्कआकारणी सुरू केली. पूर्वी चारचाकी वाहन तासभर उभे करण्यासाठी 15 रुपये लागत होते. आता त्यासाठी 60 रुपये मोजावे लागतील. 

सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी चौप्पट शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. दोन महिन्यांत संपूर्ण मुंबईतील 88 वाहनतळांवर हे शुल्क लागू होणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील पार्किंगसाठीही पैसे मोजावे लागणार आहेत. या परिसरात महिनाभर चार चाकी वाहन उभे करायचे असल्याने तीन हजार 960 रुपये मोजावे लागतील. यावरून राजकीय विरोधही होण्याची शक्‍यता आहे. या शुल्कवाढीमुळे पालिकेच्या महसुलात चौप्पट वाढ होणार आहे. 

निवासी इमारतींच्या परिसरात रस्त्यावर होणाऱ्या पार्किंगसाठी मासिक शुल्क मोजावे लागणार आहे. त्याची सुरुवात आजपासून फोर्ट परिसरातील 18 वाहनतळांवर करण्यात आली. या वाहनतळांवर चार चाकी वाहन उभे करण्यासाठी पूर्वी 15 रुपये मोजावे लागत होते. तेथे आता 60 रुपये मोजावे लागतील. दुचाकीसाठी तासाला दोन रुपये शुल्क होते; आता 15 रुपये मोजावे लागतील. 

सर्व वाहनतळांवर शुल्कवसुलीसाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा मागवण्यात येतील. या प्रक्रियेसाठी दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात 18 वाहनतळांवर नवी शुल्कआकारणी सुरू करण्यात आली आहे. त्यातील 11 वाहनतळ पालिका सांभाळते; तर सात ठिकाणी कंत्राटदार आहेत. त्यांना आता नव्या शुल्कानुसार पालिकेला पैसे द्यावे लागतील, अशी माहिती ए प्रभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. 

पालिकेने वाहनतळांवर येणाऱ्या वाहनांच्या संख्येनुसार वाहनतळांची अ, ब, क अशी वर्गवारी केली आहे. फोर्ट व कुलाबा परिसरातील सर्व वाहनतळ "ए' वर्गात असल्याने त्यासाठी सर्वाधिक शुल्क मोजावे लागणार आहे. भाजपचे स्थानिक आमदार राज पुरोहित यांनी या धोरणाला विरोध केला होता. आता सर्वच राजकीय पक्ष विरोध करण्याची शक्‍यता आहे. 

येथील पार्किंग महाग 
- महात्मा फुले मंडई 
- वस्तुसंग्रहालयाच्या जवळील वाहनतळ, 
- बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग 
- नरोत्तम मोरारजी मार्ग 
- हुतात्मा चौक क्रमांक 3 
- इरॉस सिनेमासमोर 
- नाथाबाई ठक्करसी मार्ग 
- फोर्ट बेलासेन्स एरिया 
- वालचंद हिराचंद मार्ग 
- शिवसागर राम गुलाम मार्ग 
- सर पी. एम. रोड 
- रामजी खमानी मार्ग (पूर्व आणि पश्‍चिम) 
- वालचंद हिराचंद मार्ग 
- रिगल सिनेमा 
- बॉम्बे हॉस्पिटल 
- अदी मेहरजबान मार्ग 
- जे. एन. हेरेदिया मार्ग 

नवे दर रुपयांत (तीन आणि चार चाकी वाहने) 
वर्ग - एक तास - 12 तास 
अ वर्ग - 60 - 210 
ब वर्ग - 40 -140 
क वर्ग - 20 - 70 

नवे दर रुपयांत (दुचाकी वाहनांसाठी) 
वर्ग - एक तास - 12 तास 
अ - 15 -- 90 
ब--10--60 
क - 5 -- 25 

मासिक पास 
- अ वर्गासाठी - चार चाकी वाहनांना दिवसा तीन हजार 960 रुपये व रात्री 1980 रुपये 
- अ वर्गासाठी - दुचाकी वाहनांसाठी दिवसा एक हजार 650 व रात्री 825 रुपये 
- ब वर्गासाठी - चार चाकी वाहनांसाठी दिवसा दोन हजार 640 व रात्री एक हजार 320 रुपये 
- ब वर्गासाठी - दुचाकी वाहनांना दिवसा एक हजार 100 व रात्री 550 रुपये 
- क वर्गासाठी - चार चाकी वाहनांना दिवसा एक हजार 320 व रात्री 660 रुपये 
- क वर्गासाठी - दुचाकी वाहनांना दिवसा 550 व रात्री 275 रुपये 

Web Title: Parking fee fourfold