वाहनतळांवरील लुटमारीला लवकरच लगाम?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मुंबई - वाहनचालकांना घरातून बाहेर पडल्यावर पार्किंगसाठी जागा कोठे आहे, हे आता कळणार आहे. महापालिका वाहनतळांसाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार करते आहे. सर्व वाहनतळांचे "जीआयएस मॅपिंग' करून इंटरनेट आधारित पार्किंग सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनतळांवर होणारी लूटमार बंद होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई महापालिकेने 2014 ते 2034 पर्यंतच्या विकास आराखड्यात पार्किंगसाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार करण्याची शिफारस केली होती. राज्य सरकारने ही शिफारस मान्य केल्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली हे प्राधिकरण तयार करण्यात येत आहे. पूर्व उपनगर विभागाचे अतिरिक्त आयुक्त हे पार्किंग प्राधिकरणाचे आयुक्त असतील. या प्राधिकरणात परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस यांचा सहभाग असेल.

Web Title: Parking Loot Control Parking Software