माथाडी भवनला पार्किंगचा विळखा

नो पार्किंग झोनमध्येही वाहने उभी करण्यात आली आहेत.
नो पार्किंग झोनमध्येही वाहने उभी करण्यात आली आहेत.

नवी मुंबई : वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दाखल होणाऱ्या शेकडो अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी सोय नसल्यामुळे येथील पार्किंगची समस्या दिवसागणिक अधिकाधिक गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे परिसराला तिन्ही बाजूंनी पार्किंगचा विळखा पडला आहे.

वाशी, सेक्‍टर १९ येथे माथाडी भवनात शॉपिंग कॉम्प्लेक्‍स उभारण्यात आले असून, या ठिकाणी घाऊक व्यवसायही केला जातो. त्यामुळे या विभागात ग्राहकांची अफाट गर्दी असते. समोरच दाणा बाजार आहे. माथाडी भवनाच्या तिन्ही बाजूंना नो पार्किंग झोनमध्येही रस्त्यांवरच दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केल्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या भेडासावते. हा रस्ता तुर्भे, वाशी, सानपाडा या मुख्य रस्त्यांना जोडलेला आहे. जवळच मसाला बाजारही आहे. त्यामुळे या ठिकाणीही वाहनांची अधिक वर्दळ असते. मुख्य चौकालगत वाहने पार्क केल्याने इतर वाहनांच्या वाटेत अडथळे निर्माण होतात. या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांच्या दोन रांगा लागलेल्या दिसतात. इथे एकेरी पार्किंगवर कारवाई केली जात नाही. मात्र, दुहेरी पार्किंग केल्यास कारवाई केली जाते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

एपीएमसीतील ट्रक टर्मिनल अपुरे
एपीएमसी बाजारात दररोज हजारो अवजड वाहने ये-जा करतात. वाहनतळ नसल्याने ती रस्त्यावरच उभी केली जातात. एपीएमसीत ट्रक टर्मिनल आहे, परंतु तेही अपुरे पडते. तसेच इतर वाहनांच्या पार्किंगला एकही वाहनतळ उपलब्ध नसल्याने या ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जातात.

या ठिकाणी एकही वाहनतळ उपलब्ध नसल्याने नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी केली जातात. या ठिकाणी एकेरी पार्किंगऐवजी, दुहेरी पार्किंग केल्यास कारवाई करण्यात येते. 
- अभय महाजन, पोलिस निरीक्षक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com