पार्किंग प्लॉटची संख्या एप्रिलपासून 300 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - मुंबईतील पार्किंगची समस्या गंभीर स्वरूप घेत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पार्किंग प्लॉटची संख्या 92 वरून 300 पर्यंत वाढवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी 30 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. 

महापालिकेच्या विभागप्रमुखांची आढावा बैठक शनिवारी (ता. 4) पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात झाली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात पार्किंग प्लॉट वाढवण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. या बैठकीला चार अतिरिक्त आयुक्तही उपस्थित होते. 

मुंबईत पालिकेची "रस्त्यावरील वाहनतळ' आणि "रस्त्या व्यतिरिक्त वाहनतळ' आहेत. रस्त्यांवरील वाहनतळ 92, तर इतर वाहनतळ 29 आहेत. ही संख्या आवश्‍यकतेपेक्षा कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन, रस्त्यांवरील वाहनतळांची संख्या 92 वरून 300 पर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने आवश्‍यक ती प्राथमिक कार्यवाही 30 एप्रिल 2017 पर्यंत पूर्ण करावी, असे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) आणि सर्व प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. सर्व संबंधित सहायक आयुक्तांनी त्यांच्या क्षेत्रातील कोणत्या भागात वाहनतळांची अधिक गरज आहे, याची पाहणी करून रस्त्यांवरील वाहनतळांसाठी सुयोग्य जागा निश्‍चित कराव्या आणि त्याबाबतची माहिती तातडीने प्रमुख अभियंत्यांना द्यावी, असेही निर्देश पालिका आयुक्तांनी दिले. 

अटी बंधनकारक 
दूरध्वनी, भ्रमणध्वनी, घरगुती वापराच्या गॅसची पाईपलाईन, विद्युत वाहिन्या यांच्यासाठी रस्ते खोदले जातात. अशा खोदकामासाठी परवानगी देताना महापालिका अटी आणि शर्ती घालते. त्यानुसार काम चालू असलेल्या ठिकाणी फलक लावणे, त्यावर संस्थेचे नाव, संस्थेच्या समन्वय अधिकाऱ्याचे नाव, त्याचा मोबाईल क्रमांक, काम सुरू झाल्याची आणि पूर्ण होण्याची तारीख इत्यादी तपशील ठळकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी संरक्षक कठडे उभारणेही बंधनकारक आहे. अटींची पूर्तता न केल्यास सर्व ठिकाणची कामे तातडीने बंद करावीत आणि अटींची पूर्तता झाल्यानंतरच खोदकामाला परवानगी द्यावी, असे आदेशही आयुक्त मेहता यांनी दिले आहेत.

Web Title: Parking plot number 300 from April