पोपटमालक जाणार तुरुंगात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मुंबई - भारतीय पोपट पाळणाऱ्यांची आता खैर नाही. मुक्‍या जीवाला पिंजऱ्यात ठेवणाऱ्या पशुप्रेमींना शोधण्यासाठी वन विभागाने मुंबईत खबरी पेरले आहेत. खबऱ्यामार्फत एखाद्या पाळीव पोपटमालकाची माहिती मिळाल्यास त्याला दोन ते चार हजारांपर्यंतचा दंड, तसेच वेळ पडल्यास सात वर्षांपर्यंतचा तुरुंगवासही होऊ शकतो.

वन विभागाच्या कायद्यानुसार भारतीय पोपट पाळणे गुन्हा आहे. त्यानुसार पाळलेले पोपट वन विभागाच्या ताब्यात द्यावेत, असे आवाहन सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. त्यासाठी १० दिवसांच्या मुदतीत प्रतिसाद न मिळाल्यामुळे ती सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील अवघ्या १३ जणांनी पाळीव पोपट वन विभागाकडे दिले. त्यामुळे आता वन विभागाने थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंजऱ्यातील पोपटाच्या अवस्थेवरून हा दंड ठरवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

जमा पोपट आणि दंडवसुली
वांद्रे येथून दोन, दादरमधून चार व बोरिवलीतून तीन असे मिळून नऊ पोपट हस्तगत करण्यात आले. त्याचप्रमाणे वांद्रे येथून चार हजार, दादरमधून सात, तर बोरिवलीतून पाच हजारांची दंडवसुली वन विभागाने केली आहे. 

आता केवळ धाड टाकूनच पाळीव पोपट जप्त केले जातील. १९२६ या हेल्पलाईनच्या माध्यमातून वन विभागाकडे पोपट सुपूर्द केल्यास कारवाई होणार नाही. 
- संतोष कंक, वनक्षेत्रपाल, मुंबई विभाग, ठाणे प्रादेशिक वन विभाग.

Web Title: Parrot Owner in Jail Crime