Breaking : मुंबईतील नागपाड्यात दुमजली इमारतीला भाग कोसळला, नागरिक ढिगाऱ्यात अडकल्याची भीती

सुमित बागुल
Thursday, 27 August 2020

मिश्रा इमारत असं या इमारतीला ओळखलं जातं. या इमारतीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.

मुंबई : मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय. मुंबईतील नागपाडा भागात एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्यात काही नागरिक अडकल्याची माहिती देखील समोर येतेय. सदर दुर्घटनाग्रस्त इमारत ही नागपाडा भागातील दुमजली इमारत आहे.

मिश्रा इमारत असं या इमारतीला ओळखलं जातं. या इमारतीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या ढिगाऱ्यात तीन ते चार जण अडकल्याची माहिती समोर येतेय. अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या बिल्डिंगच्या कोसळलेल्या भागात, ढिगाऱ्यात तीन ते चार जण अडकल्याचे समजतंय, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशनसध्या सुरु आहे.

हेही वाचा : राज्यातील मंदिरं खुली करण्याबाबत संजय राऊतांचं 'मोठं' विधान, काँग्रेसबाबत राऊत म्हणालेत...

मुंबईत पावसाची ये जा सुरु आहे. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येऊ शकतात. दरम्यान आता (दुपारी २.४० वाजता ) पावसाने उघडीप घेतल्याने रेस्क्यू ऑपरेशनला सुरवात झालेली आहे. 

महाडमधील पाच माजली बिल्डिंग कोसळून घडलेली मोठी दुर्घटना ताजी असताना आता मुंबईतील नागपाड्यातून बिल्डिंगचा काही भाग कोसळल्याची घटना समोर येतेय.   

part of two storied building collapsed in nagpada mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: part of two storied building collapsed in nagpada mumbai