esakal | पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये गुजराती भाषेत प्रवासी उद्‌घोषणा?
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये गुजराती भाषेत प्रवासी उद्‌घोषणा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयात इंग्रजी व हिंदी भाषेबरोबरच मराठी भाषेचा वापर करण्याचा नियम आहे. त्रिभाषा सूत्रानुसार व महाराष्ट्र राजभाषा अधिनियमांतर्गत पश्चिम रेल्वे प्रशासनाने काम करणे आवश्यक आहे.

मात्र प्रशासनाकडून सातत्याने मराठी भाषेला डावलले जाते. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या कोणत्याही निकषात गुजराती भाषा बसत नसताना, लोकलमध्ये गुजरातीत उद्घोषणा करण्याचा प्रकार समोर आला आहे. पश्चिम रेल्वेवरून सोमवारी (ता. २७) सायली सोनवणे यांनी मरिन ड्राईव्ह ते दादर असा प्रवास करण्यासाठी बोरिवली धीमी लोकल मरिन ड्राईव्ह येथून दुपारी २.२३ वाजता पकडली. लोकलमध्ये प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी वेगवेगळ्या सूचना केल्या जातात. यामध्ये कोरोनाबाबत जनजागृती, लोकलमध्ये चढताना आणि उतरताना फलाट आणि पायदानमधील अंतराबाबत आदी सूचना केल्या जातात. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांना डावलून गुजराती भाषेचा नियमबाह्य वापर केल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून देखील व्यथा मांडली आहे. दरम्यान, संबंधित प्रवासी लोकलमध्ये प्रवास करत असल्याचे दिसून आले. मात्र, त्यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा: पश्चिम महाराष्ट्रानं 'मेट्रो प्रकल्प' हाती घ्यावा

पश्चिम रेल्वेवरून मरिन ड्राईव्ह ते दादर प्रवास करत असताना, प्रवासीभिमुख सेवेची व प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करण्याची उद्घोषणा फक्त गुजरातीमधून करण्यात आली. मरिन ड्राईव्ह ते दादर या प्रवासात तीनदा फलाट आणि पायदानमधील अंतरावर लक्ष ठेवण्याची सूचना गुजरातीमध्ये झाली.

- सायली सोनवणे,प्रवासी

loading image
go to top