भरउन्हात प्रवासी ताटकळत 

भरउन्हात प्रवासी ताटकळत 

ठाणे  - नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल मार्गावर रविवारी (ता. 21) घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले. भरउन्हात प्रवाशांना ठाण्यातील सिडको बसथांब्यांवर पनवेलला जाणाऱ्या बस गाड्यांची वाट पाहावी लागली. काही प्रवाशांनी ठाण्याहून नेरूळपर्यंत जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग पत्करला; मात्र नेरूळच्या गाड्यांची संख्या फारच तुरळक असल्याने प्रवाशांना अर्धा-पाऊण तास गाड्यांची वाट पाहावी लागली. पनवेल मार्गावरील रेल्वे गाड्यांच्या सेवा रद्द करण्यात आल्याने नेरूळ रेल्वेगाडीतही प्रवाशांना गर्दीचा फटका बसला. 

पनवेल मार्गावर काही तांत्रिक कारणानिमित्त मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे ठाण्याहून पनवेलला जाणाऱ्या सर्व लोकल सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑफिस आहेत. यातील काही कॉर्पोरेट्‌स ऑफिस रविवारीही कामानिमित्त सुरूच असतात. सीवूडस्‌, बेलापूर या भागात अशा कंपन्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, मुंबई उपनगरातून कामानिमित्त पनवेल, बेलापूर भागात जाणाऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला. पनवेलच्या दिशेने जाणारे अनेक जण ठाण्याहून नेरूळपर्यंत चालणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षा करत ठाणे रेल्वेस्थानकात उभे होते, तर काहींनी ठाण्याहून सुटणाऱ्या एनएमएमटी किंवा एसटीच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. 

पनवेल लोकल रद्द केल्याने आता नेरूळ गाडीची वाट पाहत आहे. सुमारे पाऊण तास झाला गाडी आली नाही. नेरूळला गेल्यानंतर पुन्हा वेगळी बस करून बेलापूरमधील ऑफिस गाठावे लागणार आहे. 
- सुदर्शन पाटील, प्रवासी 

माझ गावं पनवेल असल्याने गावी जायचे होते; मात्र आता गाड्या रद्द झाल्याने कोणता पर्याय आहे का, याची माहिती काढतो आहे. सोबत लहान मुलगा असल्याने त्यांना कसे नेऊ, हा प्रश्‍न पडला आहे. 
- प्रकाश सातदिवे, प्रवासी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com