खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना नागरिकांची पसंती

रविंद्र खरात 
गुरुवार, 10 जानेवारी 2019

कल्याण - कल्याण डोंबिवली सहित आजूबाजूच्या शहरात वाढती वाहनाची संख्या, वेळोवेळी इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी, महागाई, यामुळे वाहन खरेदीवर परिणाम झाला आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करण्यास नागरिकांनी पसंती मिळताना दिसत आहे.

कल्याण-शिळफाटा रस्ता, कल्याण-मुरबाड रोड, कल्याण-बदलापूर रोड, कल्याण-पुणे रोड, कल्याण-मुंबई रोड येथे खासगी वाहनांची यामुळे चलती आहे.

कल्याण आरटीओ कार्यालय अंतर्गत डोंबिवली, ठाकुर्ली कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड ग्रामीण, टिटवाळा या शहरांचा समावेश होतो. लोकवस्ती वाढत असताना वाहनाची संख्या वाढली मात्र रस्त्याची रुंदी न वाढल्याने चारी बाजूने वाहतूक कोंडीमुळे वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल कमी होत असल्याचे चित्र आहे.

कुठलेही वाहन खरेदी केल्यास आरटीओ कार्यालयात नोंद केली जाते. त्या आकडेवारी नुसार एप्रिल ते डिसेंबर 2017 या आर्थिक वर्षात 48 हजार 874 टूव्हीलर खरेदी करण्यात आल्या. 10 हजार 574 कार खरेदी करण्यात आल्या. 810 टुरिस्ट वाहन खरेदी करण्यात आल्या. तर 21 मीटर टॅक्सी, 5 हजार 838 रिक्षा, 4 स्कूल बस, 124 टँकर आदी एकूण 75 हजार 742 वाहने खरेदी करण्यात आली. तर एप्रिल ते डिसेंबर 2018 या कालावधीत 47 हजार 558 टूव्हीलर, 7 हजार 769 कार, 736 जीप, 844 टुरिस्ट वाहन, 4 हजार 585 रिक्षा, 24 स्कूल बस, 24 टँकर  असे एकूण 63 हजार 948 वाहनाची खरेदी करण्यात आली. दोन्ही आर्थिक वर्षात वाहन खरेदी आकडेवारी पाहता 2017 पेक्षा सन 2018 मध्ये वाहन खरेदी कमी झाल्याचे समोर आले आहे. 

वाहन खरेदी आकडेवारी का कमी झाली हे सगळ्याच ठिकाणी झाले असून, त्याचे कारण आता सांगू शकत नाही. मात्र 2017 पेक्षा 2018 मध्ये वाहने कमी खरेदी केल्याचे आकडेवारीमुळे समोर येत आहे. अशी माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.

Web Title: passengers prefers passenger transport vehicles