मंगळवारपासून डोंबिवलीतील पासपोर्ट सेवा केंद्र सुरू

ठाणे उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा
Mumbai
MumbaiSakal

डोंबिवली : डोंबिवली (Dombivali) एमआयडीसीतील (MIDC) पोस्ट ऑफिसच्या आवारात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या मंगळवारी 12 ऑक्टोबरला या केंद्राचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा होणार आहे. 2017 पासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे पासपोर्ट (Passport) केंद्र डोंबिवलीत सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा करीत होते. या प्रयत्नांना यश आले आहे. हे केंद्र सुरू झाल्याने ठाणे जिह्यातील उपनगरी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्र हे संपूर्ण एमएमआर प्रदेशातील एकमेव सेवा केंद्र असल्यामुळे या सेवा केंद्रावर जिल्ह्यातील सर्व उपनगरी शहरांचा भार पडत होता. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व इतर उपशहरातील नागरिकांना पासपोर्टच्या कामासाठी ठाणे गाठावे लागते. प्रवासात नागरिकांचा वेळ खर्ची होत असल्याने डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र असावे यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी 2017 पासून प्रयत्न सुरू केले. जागे अभावी सुरवातीला केंद्रास विलंब झाला. त्यानंतर एमआयडीसीतील पोस्ट ऑफिस ची यासाठी निवड करण्यात आली.

Mumbai
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 'डीबीटी'द्वारे मिळणार 50 हजार

त्यातही कोरोना प्रादुर्भावामुळे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास विलंब झाला. याला आणखी विलंब होऊ नये म्हणून लोकसभा संसदीय पावसाळी अधिवेशना दरम्यान खासदार शिंदे यांनी संचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांची भेट घेतली होती. संचार राज्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळताच एमआयडीसीतील पोस्ट ऑफिस कार्यालयाच्या आवारात पासपोर्ट केंद्र सुरू करण्यासाठी सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी खासदार शिंदे यांनी केंद्राच्या कामाची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी पासपोर्ट ऑफिस चे एस. व्ही. व्यवहारे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, प्रकाश म्हात्रे, रमेश म्हात्रे आदी उपस्थित आहे.

Mumbai
पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी पाचशेच्या आत रुग्ण

येत्या मंगळवारी पासपोर्ट सेवा केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यामुळे ठाणे उपनगरातील नागरिकांना त्याचा लाभ होईल असे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com