रसायनीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेलतर्फे पथनाट्य

लक्ष्मण डुबे 
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

रसायनी (रायगड) - रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथील बाजार पेठेत सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखेच्या आणि पनवेल विवेकवाहीनीच्या तरूण कार्यकर्त्यांनी "हिंसा के खिलाफ, मानवता की ओर" या विषयावर पथनाट्य सादर केले. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.

रसायनी (रायगड) - रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथील बाजार पेठेत सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखेच्या आणि पनवेल विवेकवाहीनीच्या तरूण कार्यकर्त्यांनी "हिंसा के खिलाफ, मानवता की ओर" या विषयावर पथनाट्य सादर केले. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.

दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाली आणि त्यांच्या पाठोपाठ पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंताच्या निर्घृणपणे हत्या झाल्या. या हत्येच्या निषेध करण्यासाठी अंनिस कार्यकर्त्यासह संवेदनशील साहित्यिक, कलावंत आणि नागरीक पुढे सरसावले. गेले पाच वर्षे कुठेही खळ खटाक न होता संविधानानिक मार्गाने शांतपणे हे गेले पाच वर्षे निषेध व्यक्त केला गेला. सोशल मिडीयावर "जबाब दो" या अभियानाद्वारे हे सरकारी आणि असहिष्णू व्यवस्थेला प्रश्न विचारले गेले. ह्या साऱ्या अभियानाला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भरघोस प्रतिसाद मिळाला.

या पथनाट्यात एकंदरीत समाजातील विविध हिंसेवर नाराजी व्यक्त केली गेली. अंनिसचा व पनवेल विवेकवाहीनीचा तरूण कार्यकर्ता वैभव शिंदे याचे लेखन व दिग्दर्शन केले. प्रियंका खेडकर, देवयानी पाटेकर, तनूश्री, हर्षल, नाजूका या पनवेल विवेकवाहीनी व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कसदार अभिनय करत हा विषय समर्थपणे प्रेक्षकांसमोर मांडून रसिकांना अंतर्मुख केले.

अलीकडे डॉ. दाभोलकर यांच्या संशयित मारेकऱ्याला अटक झाली असली तरी खरा सूत्रधार मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असे अंनिस कार्यकर्ते व रसायनी परिसरातील साहित्यिक रोहिदास कवळे यांनी स्पष्ट केले. हे पथनाट्य यशस्वी करण्यासाठी अंनिस समर्थक कार्यकर्त्यासह साहित्यिक रोहिदास कवळे यांच्या पत्नी प्राजक्ता कवळे यांनी मेहनत घेतली.

Web Title: pathanatya by Panvel for anti-superstition committee